अर्थसंकल्प २०२६ : शेतकरी कर्जमाफी, मेट्रोचे जाळे, स्टार्टअप हब; फडणविसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
अजित पवारांना अर्थसंकल्प समर्पित; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'ची घोषणा; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरचं महाराष्ट्र
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026) सादर केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना हा अर्थसंकल्प समर्पित करताना फडणवीस भावूक झाले. शेतकरी कर्जमाफीपासून ते मेट्रोच्या जाळ्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. सादर करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पाचे प्रमुख मुद्दे...
अभिवादन आणि श्रद्धांजली
हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकसित महाराष्ट्राचा मार्ग प्रशस्त करणारा आहे.
महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त समिती स्थापन; विविध कार्यक्रमांसाठी निधी.
चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगडमध्ये पायाभूत सुविधा; 'सामाजिक समरसता वर्ष' म्हणून साजरा करणार.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण.
अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य स्मारक आणि त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू करण्याची घोषणा. "अजितदादांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला, त्यांच्यामुळे आर्थिक शिस्त राहिली" - देवेंद्र फडणवीस.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.
प्रादेशिक संतुलित विकासासाठी ४ प्रमुख स्तंभ व १६ उपक्षेत्रे निश्चित.
शेती आणि ग्रामीण विकास
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना: ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ.
मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनांची घोषणा.
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांचा समावेश.
महिला आणि कल्याणकारी योजना
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू राहणार; आवश्यक तरतूद.
राज्यात ३७ लाख लखपती दीदी; आणखी २५ लाख बहिणींना लखपती करण्याचे उद्दिष्ट.
उद्योग व रोजगार
नवे गुंतवणूक धोरण जाहीर; प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघु उद्योग केंद्रे.
मुंबई-पुण्याला ५० अब्ज डॉलरचे सेवा केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट.
गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी २९५ पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ उभारणार.
स्टार्टअप हब: महाराष्ट्रात १ लाख २५ हजार उद्योजक घडविणे व ५० हजार स्टार्टअप तयार करण्याचे उद्दिष्ट.
युनिकॉर्न स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र अव्वल.
शहरी विकास आणि वाहतूक
मेट्रोचे जाळे: राज्यात १२०० किमीचे मेट्रो मार्ग; २०२९ पर्यंत १६५ किमी मेट्रो मार्गिका खुल्या होणार.
वडाळा-गेट वे ऑफ इंडिया मेट्रो-११ (२३,४८७ कोटी) आणि मुंबई-नवी मुंबई विमानतळ मेट्रो-८ (२२,८६२ कोटी) या भूमिगत प्रकल्पांना मान्यता.
द्रूतगती मार्ग: ६००० किमी पेक्षा जास्त लांबीचे द्रूतगती मार्ग विकसित करणार.
दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम; वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होणार.
नागपूर रिंगरोडला मंजुरी.
चौथी मुंबई म्हणून वाढवणचा विकास; एमएमआरमध्ये १० लाख नवी घरे उभारणार.
ऊर्जा व विमानतळ
२०४७ पर्यंत ७५ टक्के स्वच्छ ऊर्जेचे धोरण.
'मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना' २०२६-२७ मध्येही सुरू राहणार; २० हजार कोटी रुपये आरक्षित.
बारामती, लातूर, अमरावती विमानतळांवर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा.
गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन; शिर्डी, नाशिक, संभाजीनगर, अकोला, रत्नागिरी विमानतळांचा विस्तार.
पालघरमधील सातपाटी येथे आधुनिक बंदर; वाढवण बंदरातून १२ लाख रोजगारनिर्मिती.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.