⚡ ब्रेकिंग News

बारामतीत भीषण अपघात; ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको


  बारामतीत भीषण अपघात; ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको

 काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला; गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

बारामती: बारामती तालुक्यातील जळगाव क. प. (जळगाव काबुलपाट) येथे सोमवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. या अपघातात मेडद ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मधुकर धोंडीबा जगताप (रा. भिलारवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास राज्य मार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ग्रामसेवक जगताप यांना बचावण्याची संधी मिळाली नाही.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. अपघातानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला. या राज्य मार्गावर अद्याप गतिरोधक बसवण्यात आलेले नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संतप्त ग्रामस्थांनी जळगाव क. प. येथेच रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लवकरच या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, अपघात घडवून पसार झालेल्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असून संबंधित चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कर्तव्यदक्ष ग्रामसेवक म्हणून ओळख असलेल्या मधुकर जगताप यांच्या निधनाने भिलारवाडी आणि मेडद परिसरावर शोककळा पसरली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...