नगराध्यक्ष यु.टी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; नवीन मटण मार्केटसाठी व्यावसायिकांचा सकारात्मक प्रतिसाद
क्रांती न्यूज वृत्त:
आटपाडी : आटपाडी नगरपंचायत हद्दीतील मटण, चिकन व मासे विक्रेत्यांची बैठक नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष यु.टी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व मांस विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
आटपाडी गावाचे शहरीकरण होत असताना स्वच्छतेबरोबरच सर्व व्यावसायिकांनी एकाच छताखाली येणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्ष श्री. जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. "सर्वांनी एकत्र आल्यास गावाचे रूपडे बदलण्यास मदत होईल. त्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला उपस्थित सर्व व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी पंच परमेश्वराचे महत्त्व अधोरेखित करताना माजी सरपंच स्व. रामभाऊ पाटील यांनी घेतलेला दर सोमवारी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय पुढे नेण्याचे एकमताने ठरविण्यात आले. तसेच नवीन मटण मार्केटमध्ये लाईट व पाणी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीस उपाध्यक्षा मीनाक्षीताई पाटील, गटनेते ऋषिकेश देशमुख, नगरसेविका मनिषा पाटील, राधिका दौंडे, संगम डोंबे उपस्थित होत्या. व्यावसायिकांच्या वतीने बॅलीस्टर मुलाणी, नाथकलंदर खाटीक, फिरोज खाटीक, सत्तार मुलाणी, इन्नुस खाटीक, झाकीर मुलाणी, रामकृष्ण देशमुख, फारुक मुलाणी, अंनिस खाटीक, रहिमान खाटीक, मोहीन खाटीक, असिफ खाटीक, अर्षद खाटीक, सद्दाम मुल्ला, आरमान मुलाणी, आदम मुलाणी, शाहरूख पठाण, रियाज मुलाणी, जब्बार मुलाणी, फैयाज इनामदार, शाहरूख शेख, शब्बीर मुलाणी, मैनुद्दीन मुलाणी, रमजान शेख, अरबाज शेख, कदीर मुल्ला, शंकर ऐवळे, संतोष ऐवळे, रविंद्र नांगरे, रफिक शेख, महंमद शेख, शहाबुद्दीन शेख आदी उपस्थित होते.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.