⚡ ब्रेकिंग News

पारनेरमध्ये कीर्तनकार 'महाराज'वर अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गंभीर आरोप; पोस्कोनुसार गुन्हा दाखल



  पारनेरमध्ये कीर्तनकार 'महाराज'वर अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गंभीर आरोप; पोस्कोनुसार गुन्हा दाखल

वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षावर १७ वर्षीय मुलीवर पाच वर्षे अत्याचार केल्याचा आरोप

 विरोध केल्यास कुटुंबाला संपवण्याची धमकी; गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन मारहाण

पारनेर पोलिसांनी आरोपीला पहाटे अटक करून न्यायालयात हजर केले; २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

अहिल्यानगर: वारकरी संप्रदायाच्या लौकिकाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील ढवळीपूर गावात घडली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) (वय ३८) याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

पाच वर्षांचा अत्याचार; धमकी देऊन केले शोषण

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने २०२१ पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. विरोध केल्यास 'मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, कुटुंबाला संपवून टाकीन' अशी धमकी देऊन तो पीडितेला घाबरवत होता.

गरम पक्कडीने दिले चटके; अमानुष मारहाण

१० मार्च २०२६ रोजी हा प्रकार शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून घरी बोलावले. उशिरा आल्याचा राग धरत आरोपीने तिला बांबूने आणि चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या अंगावर चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जाळून टाकण्याची धमकी देत कोणालाही काही सांगू नकोस, अशी तंबीही त्याने दिली.

भावाने केली तक्रार; पोलिसांनी घेतली त्वरित दखल

चटके आणि मारहाणीमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. १४ मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

पोलीस कोठडीत आरोपी; पुढील चौकशी सुरू

पारनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रविवारी पहाटे चार वाजता आरोपी यशवंत थोरात याला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले असून, पोलीस चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून, अशा 'भोंदू' महाराजांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...