⚡ ब्रेकिंग News

"निलंबन छोटी गोष्ट; जनतेच्या प्रश्नासाठी फासावर चढेनही" - खासदार प्रशांत पडोळे

नवी दिल्ली : लोकसभेत निलंबित काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. "माझं निलंबन ही छोटी गोष्ट आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी फासावर चढवलं तरी मी तयार," असं ते म्हणाले.

भाजप नेत्यांवर आरोप

लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ प्रकरणी मंगळवारी आठ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आलं. पडोळे म्हणाले, "आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो, तेव्हा कागद फाडण्याचा आरोप. पण भाजप नेते सभागृहात अनपार्लमेंटरी शब्दांचा वापर करतात. रेकॉर्ड बघा, त्यांच्यावर कधी कारवाई झाली नाही?"

विरोधकांना बोलू देत नाहीत

"विरोधकांना सभागृहात बोलू देत नाहीत. राहुल गांधी किंवा आम्ही जनतेच्या सुरक्षेचे मुद्दे उपस्थित करू शकत नसू तर लोकसभा कशासाठी?" असा सवाल पडोळेंनी उपस्थित केला. गोसेखुर्द प्रकल्प बाधितांसाठी प्रियंका गांधींनी पाठिंबा दिल्याचं सांगत ते म्हणाले, "आम्ही लढत राहू. मोदी सरकारला सांगतो - जनतेच्या प्रश्नांसाठी फासावर चढायला तयार आहोत."

लोकसभेत पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांनी सांगितल्याप्रमाणे, निलंबित खासदारांनी अध्यक्षांकडे कागद फेकले आणि गोंधळ घातला होता.






Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...