⚡ ब्रेकिंग News

महिला सुरक्षा आणि कायदेशीर कारवाईत भरारी: म्हसवड पोलीस ठाण्याचा जिल्ह्यात गौरव


महिला सुरक्षा आणि कायदेशीर कारवाईत भरारी: म्हसवड पोलीस ठाण्याचा जिल्ह्यात गौरव

सातारा / क्रांती न्यूज - प्रतिनिधी: जानेवारी २०२६ महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल म्हसवड पोलीस ठाण्याला सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून गौरविण्यात आले आहे. महिला सुरक्षा, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि वॉरंट बजावणी या तीन महत्त्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत म्हसवड पोलिसांनी चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या संकल्पनेतून जनतेच्या हितासाठी आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस ठाण्यांना दरमहा क्राईम कॉन्फरन्समध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येते. याच अनुषंगाने जानेवारी महिन्यात म्हसवड पोलीस ठाण्याने केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना हा बहुमान मिळाला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. पोलिसांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:

१. महिला सुरक्षेत भरारी:
मुलींची छेडछाड रोखणे, गुड टच-बॅड टचचे मार्गदर्शन, शाळा-महाविद्यालयांना भेटी देणे आणि रोड रोमियोवर कारवाई या बाबतीत जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 'सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

२. गंभीर गुन्ह्यांचा जलद तपास:
महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्याचा तपास अवघ्या २४ तासांत पूर्ण करून सबळ पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दल म्हसवड पोलिसांना विशेष प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यासोबतच एका वेगळ्या प्रकरणात महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी देखील २४ तासांत तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल केल्याबद्दल अतिरिक्त पुरस्कार देण्यात आला.

३. फरार आरोपींवर कारवाई:
नॉन बेलेबल वॉरंट (NBW) मधील तब्बल १५ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केल्याबद्दल म्हसवड पोलिसांना 'सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या कामगिरीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक वॉरंट बजावणीचा विक्रमही त्यांच्या नावावर झाला.

ही सर्व पुरस्कार प्रदान सोहळा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशिष्ट कडूकर यांच्या हस्ते पार पडला. या यशाचे श्रेय सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह भगवान सजगणे, राजेंद्र कुंभार, राहुल थोरात, सतीश जाधव, विकास ओंबासे, कोमल काळेल आणि ज्योती सरगर या संपूर्ण टीमला जाते.

म्हसवड पोलीस ठाण्याने अशाप्रकारे सलग उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात आदर्श निर्माण केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्यांचे विशेष कौतुक होत आहे. 

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...