⚡ ब्रेकिंग News

अजित दादा वॉज द बेस्ट सीएम महाराष्ट्र नेव्हर हॅड": फडणवीसांच्या भावुक श्रद्धांजलीने सभागृह भारावून

 महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना फडणवीस यांचा आवाज भरून आला आणि त्यांनी अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक अंगांना उजाळा दिला. 'पोकळी' या शब्दाची व्याप्ती काय असते ते आज समजल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना 'बेस्ट मुख्यमंत्री महाराष्ट्र नेव्हर हॅड' असे संबोधून संपूर्ण सभागृह स्तब्ध केले.


मुंबई:- (क्रांती न्यूज) - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर विधानभवनात शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या आठवणींना उजाळा देत त्यांना शब्दांजली वाहिली.

'माझे ते दादाच होते'

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पोकळी या शब्दाची व्याप्ती काय असते हे आज मला कळत आहे. कारण अजित दादांसारखा नेता पुन्हा होऊ शकत नाही आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेली पोकळी कोणी भरून काढू शकणार नाही. २०१४ नंतर आमच्यात जी जवळीक निर्माण झाली, ती शेवटपर्यंत कायम राहिली. खऱ्या अर्थाने ते माझे दादाच होते."

वक्तशीरपणाचं वेळच चुकलं

अजित पवार यांच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकताना फडणवीस म्हणाले, "सकाळी सहा वाजल्यापासून काम सुरू करणारा, प्रत्येक गोष्टीचे नियोजन करणारा आणि सेकंदाचाही सदुपयोग करणारा नेता म्हणून अजित दादा ओळखले जायचे. पण ज्या वेळी त्यांनी खऱ्या अर्थाने मोठी इनिंग खेळायची होती, त्या वेळी मात्र जीवनाचं टायमिंग चुकलं. वक्तशीर अशा दादांचा हा अपघातही वेळेचं गणित चुकल्यासारखाच आहे."

'बेस्ट मुख्यमंत्री महाराष्ट्र नेव्हर हॅड'

फडणवीस पुढे म्हणाले, "अजितदादा सर्वाधिक सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिले. ते विनोदाने म्हणायचे की, 'मी कधीतरी मुख्यमंत्री होईन', पण यावेळीही उपमुख्यमंत्रीच राहीन. मला विश्वास होता की नियतीने त्यांना ती संधी दिली असती, कारण ती समता त्यांच्यात होती. आज मी हक्काने म्हणू शकतो की, **'अजितदादा पवार वॉर द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड.'** महाराष्ट्रात वसंतदादा आणि अजितदादा ही दोन नावं कायम स्मरणात राहतील."

'एका पिढीचा विश्वास होते'

अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू उलगडताना मुख्यमंत्री म्हणाले, "अजित दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एका संपूर्ण पिढीचा विश्वास होता. ते मातीतून तयार झालेले नेतृत्व होते. ते कधी कुणापुढे झुकले नाहीत; मात्र चूक झाल्यास जाहीर माफी मागायलाही ते कधी कचरले नाहीत. टीका आणि विरोधाला तोंड देताना त्यांनी कधीही पाठ दाखवली नाही. त्यांच्या स्वभावात पारदर्शकता होती आणि ते एकवचनी होते. ही पोकळी कधीही भरून न येणारी आहे."

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...