⚡ ब्रेकिंग News

तोपर्यंत हे बटण असंच उघडं ठेवेन!"; अजित दादांच्या आठवणीने सभागृहात भिजले रोहित पवार, अपघात प्रकरणी मोठी घोषणा केली





"जो दोषी असेल, त्याला तुरुंगात पाठवल्याशिवंत सोडणार नाही"; रोहित पवारांचा सभागृहात अजित दादांना भावनिक निरोप

मुंबई / क्रांती न्यूज विशेष प्रतिनिधी:
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे भावनाविवश झाले. विधानसभेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शोकप्रस्तावावर बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या खास आठवणींना उजाळा देतानाच अपघातप्रकरणी दोषींना शिक्षा करण्याचा इशाराही दिला. त्यांच्या भावूक शब्दांनी संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले.

'दादांच्या जाण्याने राजकारणातील मिश्कीलपणा गेला'
रोहित पवार म्हणाले, "अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा कायमचा गेला." यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील अनेक आठवणींनाही उजाळा दिला.

'चाळीस-पन्नास वर्षांनी भेटेन, तोपर्यंत बटण असंच ठेवणार'
सर्वात भावूक करणारा क्षण म्हणजे जेव्हा रोहित पवार यांनी आपल्या शर्टच्या वरच्या बटणाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, "अजितदादा मला नेहमी म्हणायचे, 'रोहित, तुझं शर्टचं वरचं बटण लावत जा.' पण मी आज त्यांना शब्द देतो की, चाळीस-पन्नास वर्षांनी जेव्हा मी त्यांना भेटायला जाईन, तेव्हाच हे बटण लावेन. तोपर्यंत हे बटण असंच उघडं राहील, जेणेकरून दररोज सकाळी आरशात पाहताना मला माझ्या काकांची आठवण येत राहील."

'केस कापले, पण हेअरस्टाईल तीच ठेवणार'
त्यांनी सांगितले, "दादा मला म्हणायचे की, 'तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, त्या कमी कर आणि शारिरीक वजन कमी करून राजकीय वजन वाढव.' दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. पण आज मी शब्द देतो की, माझी ही हेअरस्टाईल अशीच ठेवेन. शारिरीक वजन कमी करेन आणि राजकीय वजन वाढवेन."

'जो दोषी असेल, त्याला सोडणार नाही'
अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले की, "एक गोष्ट मी स्पष्ट करतो. दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही मोठा असो, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. न्याय मिळवूनच राहू."

'काकी, मी तुमच्या पाठीशी आहे'
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उद्देशून भावनिक आश्वासन दिले. "काकी, तुमच्या राजकीय प्रवासात ज्यावेळी तुमच्या पुतण्याची गरज लागेल, त्यावेळी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."

रोहित पवार यांच्या या भाषणाने केवळ सभागृहच नव्हे तर राज्यभरातील अजित पवारांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणले.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...