फॅशनचा नवा 'जाळ'! इस्त्रीने जळालेल्या शर्टला १ लाखांची किंमत; नेटकरी म्हणाले - "माझी आई मोफत बनवते"
नवी दिल्ली : फॅशनच्या जगात नावीन्याची सीमा कुठवर पोहोचू शकते, याचं उदाहरण म्हणजे 'व्हेटमेंट्स' या ब्रँडचा नवीनतम शर्ट. या ब्रँडने इस्त्रीने जळाल्याचा डाग (आयर्न बर्न) असलेला एक पांढरा शर्ट बाजारात आणला आहे. या शर्टची किंमत तब्बल ११३९ डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे १ लाख रुपये) आहे. ही क्रिएटिव्हिटी पाहून सोशल मीडियावर विनोदी कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'व्हेटमेंट्स'चा अनोखा शर्ट
या शर्टचे अधिकृत नाव 'व्हाइट आयर्निंग बर्न ग्राफिक शर्ट' आहे. हा ओव्हरसाइज शर्ट असून त्यावर प्रत्यक्ष जळालेला डाग नसून ग्राफिक्सद्वारे इस्त्रीने कापड जळाल्याचे डिझाइन करण्यात आले आहे. ब्रँडने आपल्या या अनोख्या क्रिएटिव्हिटीने फॅशनप्रेमींचे लक्ष वेधले असले, तरी सर्वसामान्यांना मात्र हा प्रकार हास्यास्पद वाटतो आहे.
नेटकऱ्यांची खिल्ली
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या फॅशनची खिल्ली उडवताना विविध कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, "माझी आई असे शर्ट मोफत बनवते." तर दुसऱ्याने लिहिलं, "आता इस्त्रीने जळालेले कपडे हे 'या' ब्रँडचे आहेत, असं सांगता येईल." अशा अनेक विनोदी प्रतिक्रियांनी सोशल मीडिया ओसरला आहे.
महागड्या ब्रँडचा 'एक्सक्लुझिव्हिटी'चा खेळ
फाटलेले शूज, मळकट कपडे असे प्रकार महागड्या ब्रँड्सकडून आधीही बाजारात आणले गेले आहेत. फॅशन तज्ज्ञांच्या मते, हे ब्रँड 'एक्सक्लुझिव्हिटी'च्या नावाखाली ग्राहकांच्या मानसिकतेशी खेळत आहेत. फॅशनच्या नावाखाली जळालेले, फाटके कपडे बाजारात आणून हे ब्रँड डॉलर्समध्ये कमवत आहेत, असा संतापही अनेक यूजर्सनी व्यक्त केला आहे.
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.