अजित पवार विमान अपघात प्रकरण: 13 मुद्द्यांवर चौकशी सुरू, सर्व शंकांचे निरसन करू - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी विविध शंका उपस्थित केल्या जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. १३ निर्धारित मुद्द्यांवर सध्या चौकशी सुरू असून उपस्थित सर्व शंका सोडवल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकार आणि हवाई उड्डाण खात्याला लपविण्यासारखं काहीही नसल्याचंही ते म्हणाले.
अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतपासून हा अपघात आहे की षडयंत्र, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी डिजिटल रेकॉर्ड घेण्यात आला आहे. डेटा उपलब्ध होणार नाही, अशी काही बाब नाही. व्हॉइस रेकॉर्ड करण्यात आलेला डेटा रिकव्हर केला जात आहे. व्हीएसआर कंपनीचं ऑडिट करण्यात येत असून केवळ अपघाताच्या वेळेचंच नव्हे, तर संपूर्ण वर्षाचं ऑडिट केलं जाणार आहे. लॉगबुकसह सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. ज्या काही शंका आहेत, त्या निश्चितपणे सोडवल्या जातील."
ते पुढे म्हणाले, "केंद्र सरकार आणि हवाई उड्डाण खात्याला लपविण्यासारखं काहीही नाही. या चौकशीतून जे काही समोर येईल, ते आमच्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे." यावेळी त्यांनी एक महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, "अजित पवार यांचा अपघात झालं, त्या विमानातून मी स्वतः ४ ते ५ वेळा प्रवास केला आहे."
अधिवेशनात १५ विधेयके मांडणार
दरम्यान, सोमवारपासून (२३ फेब्रुवारी) सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण १५ विधेयके मांडली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दिवंगत अजित पवार यांच्याकडे अर्थखातं होतं; मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही चर्चेसाठी भरपूर संधी देऊ. पूर्ण कालावधी अधिवेशन चालेल. जनसामान्यांना दिलासा देत असताना काही कठोर पावलंही उचलू."
विरोधकांवर निशाणा
विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, "विरोधी पक्षाने आरोप करावेत; पण माहिती घेऊन, अभ्यास करूनच आरोप केले पाहिजेत. नुसते आरोप करून पळून जाणं योग्य नाही."
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.