⚡ ब्रेकिंग News

अभिषेक कळमकर हनी ट्रॅपचे बळी!"; निलेश लंके यांचा गंभीर आरोप - पुण्यातील युवकालाही त्याच महिलेने फसवले

 अभिषेक कळमकर हनी ट्रॅपचे बळी!"; निलेश लंके यांचा गंभीर आरोप - पुण्यातील युवकालाही त्याच महिलेने फसवले

अहिल्यानगर :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. मात्र, हा संपूर्ण प्रकार हनी ट्रॅप (लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक) असल्याचा गंभीर दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे. कळमकर यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने पुण्यातील एका युवकालाही अशाच प्रकारे फसवून पैसे उकळल्याचे लंके यांनी सांगितले.

निलेश लंके काय म्हणाले?

खासदार निलेश लंके म्हणाले, "अभिषेक कळमकर हे हनी ट्रॅपचे बळी आहेत. ज्या महिलेने हे आरोप केले आहेत, तिने यापूर्वी पुणे जिल्ह्यातील एका युवकासोबत असाच प्रकार केला आहे. त्या प्रकरणात संबंधित युवकाकडून तडजोडनामा करून मोठी रक्कम वसूल केल्याची माहिती समोर आली आहे."

रोहित पवार यांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांना 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना निलेश लंके म्हणाले, "रोहित पवार यांच्या मांडणीवरून अपघाताबाबत नक्कीच संशय येतो. एखादा व्यक्ती स्पष्टवक्ता असेल तर त्याला समाजातील काही दुर्जनांकडून धोका असतो. त्यामुळे रोहित पवार यांना सुरक्षा मिळायला हवी.

राज्यसभा निवडणुकीबाबत शरद पवारच घेणार निर्णय

दरम्यान, राज्यसभेच्या एका जागेबाबत महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असून राष्ट्रवादीला दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. यावर निलेश लंके यांनी स्पष्टोक्ती दिली. ते म्हणाले, "कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर तो शरद पवार साहेबांना विचारात घेऊनच घेतला जातो. मधल्या काळात साहेबांची तब्येत खराब होती, त्यामुळे चर्चा झाली नसेल. मात्र, राज्यसभेबाबतचा निर्णयही त्यांच्या विचारानेच होईल."

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा होतीच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सातत्याने चर्चा सुरू असून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाल्याचे समोर आले आहे. याबाबत निलेश लंके म्हणाले, "अनेक ठिकाणी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढवल्या. उमेदवारांना तुतारी की घड्याळ, असा चॉईस दिला होता. त्यामुळे एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती, हे खरे आहे."

भारत-अमेरिका करार शेतकऱ्यांसाठी हानिकारक

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि कृषी करारामुळे शेतकरी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत निलेश लंके म्हणाले, "हा करार अतिशय चुकीचा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. येणाऱ्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा जोरदारपणे मांडणार आहोत."



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...