⚡ ब्रेकिंग News

प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! 'वैचारिक मतभेद होते, मात्र असं कृत्य माझ्याकडून कधीच घडणार नाही'; मिनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया


 '२० वर्षांच्या कारकिर्दीत असा आरोप पहिल्यांदा'; 'राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न'; 'बिनबुडाचे आरोप'; 'चौकशीला सामोरे जायला तयार'; 'संजय राऊतांवर आरोप केले तर पुरावे हवेत' - मिनाक्षी शिंदे

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

ठाणे - शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर काल हल्ला करण्यात आला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. यावर मिनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे (Pradeep Purnekar Death Case) ठाणे जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी (Police) पूर्णेकरांचा जुना मित्र पप्या शिंदे यास अटक केली आहे.

मात्र, अद्यापही चार आरोपी फरार असल्याने पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या हल्ल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांच्यावर पूर्णेकर कुटुंबाने आरोप केले आहेत. या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मिनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत असा आरोप पहिल्यांदा झाला आहे."

"वैचारिक मतभेद माझे जरी बऱ्याच लोकांसोबत असले तरी कोणाला जीवे मारण्याची परिस्थिती माझ्यावर आलेली नाही," असे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.

"यावर कोणी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे."

"ही दुर्दैवी घटना आहे. ही घटना माझ्या प्रभागात घडली आहे. वैचारिक मतभेद होते. मात्र, असे कृत्य माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून कधीच घडणार नाही."

"पण काहीजण याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. बिनबुडाचे आरोप करत आहेत."

"मी आता बाहेर आहे, आल्यानंतर या घटनेवर सविस्तर बोलणार," असे शिंदे म्हणाल्या.

"पोलिस प्रशासन करत असणाऱ्या चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे. माझी चूक नाहीतर तर मी चौकशीला तयार आहे."

"मी जर उद्या संजय राऊतांवर आरोप केले, तर ते पुरावे माझ्याकडे असले पाहिजेत ना," असेही मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.

"हे सर्व राजकीय आरोप आहेत. आदित्य ठाकरे, संजय राऊत कधी गरिबांच्या घरी गेलेले बघितले नाही. राजकारण करण्यासाठी ते आलेले आहेत," असेही मिनाक्षी शिंदे यावेळी म्हणाल्या.

"मी असे कधीच करणार नाही, माझे कुटुंबीय देखील करणार नाहीत. वैचारिक मतभेद होते, पण आम्ही असे करणार नाही," असे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.

"मी चौकशीला समोर जाणार, पोलिसांना सहकार्य करणार," असल्याची माहिती एबीपी माझाशी बोलताना त्यांनी दिली.

| मुद्दा | तपशील |

| मृत | प्रदीप पूर्णेकर |

| पद | मानपाडा विभागप्रमुख, शिवसेना UBT |

| अटक | पप्या शिंदे |

| फरार | ४ आरोपी |

| आरोप | मिनाक्षी शिंदेंवर |

| मिनाक्षी शिंदे | '२० वर्षांत पहिल्यांदा आरोप' |

| म्हणणे | 'वैचारिक मतभेद, पण असे कृत्य नाही' |

| चौकशी | 'सामोरे जायला तयार' |

| राऊत | 'आरोप केले तर पुरावे हवेत' |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...