क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण चांगलेच गरम होताना दिसत आहे. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) विरोधात ठाकरे बंधूंतर्फे (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. "४ ऑक्टोबरला मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील आंदोलनामध्ये जोमाने उतरा," असे आदेश उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.
"निवडणूक आयोगाविरुद्धचा राग जो जनतेमध्ये आहे, तो रस्त्यावर दिसू द्या," अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही विभाग प्रमुखांची बैठक घेतली.
४ ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्याबाबत आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले.
२ ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे.
तसेच येणाऱ्या दसरा मेळाव्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
"चार तारखेला हा संयुक्त मोर्चा निघेल. भायखळ्यावरून हा मोर्चा निघेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथे व्यासपीठ असेल आणि तिथे त्याचे रूपांतर सभेमध्ये होईल. सकाळी दहा वाजताची वेळ आहे."
"मोर्चात काय बोलायचे ते आम्ही बोलू. परंतु, हा निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे. गेली अनेक वर्षे या विषयांवर आम्ही बोलत आलोय. २०१७-१८ मध्ये मी अनेक नेत्यांना या संदर्भात भेटलो होतो. ईव्हीएम मशीनच्या संदर्भात मी भेटलो होतो, या विषयावर सविस्तर बोलणं चार तारखेला होईल."
या मोर्चात पक्षीय राजकारण नसेल हे स्पष्ट करत राज ठाकरे पुढे म्हणाले, "या मोर्चानंतर त्याची पुढील रूपरेषा आम्ही ठरवू. आम्ही सर्वच राजकीय पक्षांना आमंत्रण देणार आहोत. सत्ताधारी पक्षातील लोकांना व्यासपीठावर यायचं असेल तर ते देखील येऊ शकतात. निवडणूक आयोगाचा गेल्या काही वर्षांतला जो कारभार आहे, त्या विरोधात हा मोर्चा आहे."
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "प्रत्येकाला फोन करून सांगितले जाईल. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. यात सर्वांच्या हातात तिरंगाच असणार आहे."
"हा विषय या देशातील लोकशाही वाचवण्याचा आणि संविधान वाचवण्याचा आहे. त्यामुळे सर्वांच्या हातात तिरंगाच असेल."
| मुद्दा | तपशील |
| मोर्चा | ४ ऑक्टोबर, निवडणूक आयोगाविरोधात |
| आयोजक | राज ठाकरे + उद्धव ठाकरे |
| मार्ग | भायखळा ते मुंबई महापालिका |
| वेळ | सकाळी १० वाजता |
| आदेश | 'जोमाने उतरा' |
| झेंडे | कुठल्याही पक्षाचे नाहीत; फक्त तिरंगा |
| आमंत्रण | सत्ताधाऱ्यांसह सर्वांना |
| २ ऑक्टोबर | कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा |
| दसरा | मेळाव्याची चर्चा |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.