क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - राज्यभरातील बहुतांश भागात पावसाने मारलेल्या लांब दडीने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रभरात आता दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. एकीकडे पावसाचे चिन्ह दिसत नसताना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हा एकदा उकाड्याचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) व्यक्त केली आहे.
तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
तर सध्या अनेक जिल्ह्यांत वाढत्या उकाड्यामुळे सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा (October Heat) प्रत्यय येतो आहे.
एकट्या नाशिक जिल्ह्यात या महिन्यात पावसाची तब्बल ७० टक्के तूट नोंदविली गेली आहे.
गेल्या १५ दिवसांत कमाल तापमानात सात अंश सेल्सियसपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती आहे.
तर तिकडे छत्रपती संभाजी नगरमध्ये ३५.८ अंश इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे.
सप्टेंबर महिन्यात नोंदवलं गेलेले हे मागील २५ वर्षांच्या तुलनेतलं उच्चांक तापमान असल्याची माहिती आहे.
शहरातील सातत्याने तपमान ३० अंशाच्या पुढे असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे.
दरम्यान, रविवारी राज्यातील चार जिल्ह्यांत तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर आणि अमरावतीमध्ये रविवारी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
तर विदर्भातील अकोल्यात ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
परिणामी आगामी काळात देखील तापमानाचा पारा वाढत राहण्याचे संकेत आहे. परिणामी नागरिकांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येतो आहे.
गडचिरोलीच्या भामरागडमधील पूर परिस्थिती सलग चौथ्या दिवशीही कायम आहे.
भामरागड गावात शिरलेले पाणी सध्या ओसरले असले तरी पर्लकोटा नदी पुलावर चार फूट पाणी असल्यामुळे आलापल्ली-भामरागड हा राष्ट्रीय मार्ग आजही बंद आहे.
पूर ओसरण्याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे. चाळीसहून अधिक गावे आजही संपर्काच्या बाहेर आहेत.
पावसाळ्याचे दिवस संपायला आलेले असतानाही भंडाऱ्यातील जलसाठा सरासरीपेक्षा कमी असल्याने पुढील काळात जिल्ह्यावर जलसंकट उभं ठाकण्याची चिंता आतापासूनच भंडारा जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
पूर्व विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला गोसेखुर्द धरण अजूनही अपूर्णावस्थेत असून या प्रकल्पात केवळ ७६% जलसाठा उपलब्ध आहे.
तर, दुसरीकडे बावनथडी प्रकल्पात केवळ ३६.७०% पाणीसाठा आहे.
चांदपूर, बघेडासह ४ मध्यम प्रकल्पांमध्ये ५९.७०% पाणीसाठा
३१ लघू प्रकल्पांमध्ये ६८.८९% पाणीसाठा
२८ मायनर मालगुजारी तलावांमध्ये ७९.३०% पाणीसाठा
खरीप हंगामातच ही परिस्थिती असल्याने येणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांसोबत मोठं जलसंकट उभं ठाकेल, अशी भीती आताच व्यक्त केली जात आहे.
| मुद्दा | तपशील |
| तापमान | ४ जिल्ह्यांत ३५ अंशांहून जास्त |
| सोलापूर, अमरावती | ३६ अंश |
| अकोला | ३५.४ अंश |
| छत्रपती संभाजीनगर | ३५.८ अंश (२५ वर्षांतील उच्चांक) |
| नाशिक | ७०% पावसाची तूट |
| भामरागड | पूरस्थिती कायम; ४०+ गावे संपर्क बाहेर |
| गोसेखुर्द धरण | ७६% जलसाठा |
| बावनथडी | ३६.७०% जलसाठा |
| हवामान अंदाज | ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तापमान वाढ |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.