क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - राज्यातील दुष्काळसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे राज्यभरात कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
असे असताना या संदर्भात कृषी आयुक्तालयाने राज्यभरातील कृषी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या सूचनांमध्ये करण्यात येणाऱ्या कृषी पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्याचे (Farmer Signature Compulsory) निर्देश देण्यात आले आहेत. या संदर्भातले प्रपत्रही (प्रोफार्मा) कृषी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, फर्स्ट ट्रिगरनुसार ज्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, त्या ठिकाणी पंचनामा करताना प्रत्येक शेतकऱ्याचे फार्मर आयडी (ॲग्री स्टॅक कार्ड) घेण्यात यावे.
ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल, त्यांचा आधार कार्ड नुकसानीच्या पंचनाम्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंचनामा अहवाल संबंधित विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून लवकरात लवकर कृषी आयुक्तालयात सादर करण्यात यावा, असे निर्देशही या पत्रात देण्यात आले आहेत.
कृषी विभागाने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या प्रपत्रामध्ये खालील माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे:
शेतकऱ्याचे नाव
त्याचे बाधित पीक
नुकसान झाल्याची टक्केवारी
फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक
शेतकऱ्याच्या बँक खात्याची सर्व माहिती
यासह सर्वात अखेरीस पंचनामा पूर्ण केल्याबद्दल शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे ही बंधनकारक करण्यात आले आहे.
निर्णयामुळे पंचनाम्यात पारदर्शकता येणार असून शेतकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
यापूर्वीही संकटात शेतकऱ्यांचे नुकसान होत होते आणि कृषी विभागाकडून पंचनामे केले जात होते. मात्र त्या पंचनाम्यासंदर्भात आरोप-प्रत्यारोप होत होते.
खरी स्थिती अशी होती की बऱ्याच ठिकाणी कृषी आणि महसूल विभागाचे जे कर्मचारी आहेत, ते गावात एका ठिकाणी बसून पंचनामे करून घ्यायचे. परिणामी अधिकारी प्रत्येक शेतावर जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी असायची.
मात्र, यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी कृषी आयुक्तालयाने संपूर्ण राज्यातील कृषी विभागाच्या कार्यालयांना या संदर्भात पत्र पाठवले आहे.
त्यामध्ये एक प्रपत्र सुद्धा जोडले असून यंदाचा हा एक महत्त्वाचा बदल दिसतो आहे.
शिवाय अखेरचा जो कॉलम आहे, त्यामध्ये पंचनामा झालेल्या शेतकऱ्याची स्वाक्षरी घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या निर्णयामुळे कुठेतरी पारदर्शकता दिसून येणार असून या निर्णयाचे स्वागत शेतकरी करत आहे.
| मुद्दा | तपशील |
| निर्णय | पंचनाम्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी बंधनकारक |
| पत्र | कृषी आयुक्तालयाकडून राज्यभरातील अधिकाऱ्यांना |
| प्रपत्र | नाव, पीक, नुकसानीची टक्केवारी, फार्मर आयडी, बँक माहिती |
| दुष्काळ | फर्स्ट ट्रिगरनुसार २६५ तालुके |
| ओळख | फार्मर आयडी किंवा आधार कार्ड |
| अहवाल | विभागीय आयुक्तांमार्फत कृषी आयुक्तालयात |
| पारदर्शकता | शेतकऱ्यांकडून स्वागत |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.