क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याच्या जामिनाला विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
एनआयएने मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून उद्या न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर तातडीची सुनावणी होणार आहे.
सचिन वाझेला विशेष सत्र न्यायालयाने जामीन दिल्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले आहे.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल व न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्याची विनंती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यावतीने मंगळवारी दुपारी करण्यात आली.
मात्र न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे या याचिकेवर उद्या बुधवारी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सचिन वाझेच्या जामिनाविरोधात एनआयएने केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सध्या सचिन वाझेचा मुक्काम ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे.
एनआयएने उच्च न्यायालयात विशेष सत्र न्यायालयाच्या जामिनाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी धाव घेतली आहे. त्यामुळे सचिन वाझे जामिनावर कधी बाहेर येणार हे मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल.
विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना सचिन वाझेवर खालील १० अटी घातलेल्या आहेत:
१. बॉण्ड आणि जामीनदार
एक लाखांच्या वैयक्तिक बॉण्डवर आणि त्याच रकमेच्या स्थानिक जामीनदारावर सुटका.
२. पासपोर्ट जमा
वाझेला पासपोर्ट असल्यास तो NIAकडे जमा करण्याचे न्यायालयाचे निर्देश.
३. ५ जिल्ह्यांत प्रवेश बंदी
महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाईपर्यंत मुंबईसह ५ जिल्ह्यांत प्रवेशास बंदी.
४. राहण्यासही मनाई
मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत राहण्यासही मनाई.
५. न्यायालयीन कामकाजासाठी परवानगी
न्यायालयीन कामकाजासाठीच या जिल्ह्यांत येण्याची परवानगी.
६. पत्ता NIAला द्यावा
राहत्या ठिकाणाचा पत्ता ७ दिवसांत NIAला देण्याचे निर्देश.
७. दर रविवारी हजेरी
दर रविवारी स्थानिक पोलीस ठाण्यात दुपारी १२ ते ३ दरम्यान हजेरी बंधनकारक.
८. साक्षीदारांशी संपर्क नको
साक्षीदारांशी संपर्क न करण्यासह पुराव्यांमध्ये छेडछाड न करण्याचे न्यायालयाचे आदेश.
९. २४ तास चार्जिंग फोन
वाझेला २४ तास पूर्ण चार्जिंग असलेला फोन बाळगण्याच्या सूचना.
१०. व्हिडिओ कॉल
एनआयए हवे तेव्हा संपर्क करून व्हिडिओ कॉल करून वाझेबद्दल पुष्टी करेल अशीही जामीन मंजूर करताना न्यायालयाची अट.
ॲड. आरती कालेकर या सचिन वाझेच्या वकील आहेत.
सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर बोलताना कालेकर यांनी म्हटले की, "महत्त्वाची बाब म्हणजे सचिन वाझे हे सुपर कॉप आहेत."
"एनआयए हायकोर्टात गेल्यास आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत," असे कालेकर म्हणाल्या.
"पाच वर्षे लढत आहोत, यापुढेही लढत राहू," असे सचिन वाझेच्या वकील कालेकर यांनी म्हटले.
| मुद्दा | तपशील |
| आरोपी | सचिन वाझे |
| जामीन | विशेष सत्र न्यायालयाकडून मंजूर |
| NIAची धाव | मुंबई उच्च न्यायालयात |
| सुनावणी | उद्या, न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर |
| न्यायमूर्ती कोतवाल | सुनावणी घेण्यास नकार |
| सध्याचे ठिकाण | ठाणे मध्यवर्ती कारागृह |
| अटी | १० प्रमुख अटी |
| पासपोर्ट | NIAकडे जमा |
| प्रवेश बंदी | मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर |
| हजेरी | दर रविवारी, १२ ते ३ |
| वकील | ॲड. आरती कालेकर |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.