क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दुष्काळ मोर्च्यात जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
दुष्काळावरून पंढरपुरात राष्ट्रवादीने मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये खासदार मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठी टीका केली होती.
यानंतर आता भाजपने थेट मोहिते पाटील यांना उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी मोहिते पाटील यांनी आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या पाणी टँकरबाबत कधी माहिती घेतली का? ते कधी बांधावर गेले का? असे सवाल करीत मोहिते पाटील यांना डिवचले आहे.
तसेच "पंढरपूरातील मोर्चा म्हणजे स्टंट आणि अस्तित्वाची लढाई होती. राष्ट्रवादीचे आमदारही या मोर्चाला नव्हते," अशीही टीका यावेळी भाजपाचे नेते चेतनसिंह केदार यांनी केली आहे.
त्यामुळे सोलापुरात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध मोहिते पाटील असा राजकीय कलगीतुरा रंगला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना बदलण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली होती.
दुष्काळ मोर्चादरम्यान त्यांनी पालकमंत्र्यांना बदलण्याची मागणी केली होती.
या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी मोहिते पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या राजकीय मर्यादांवरच बोट ठेवले, तर शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी मोर्चालाच स्टंटबाजी म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला होता.
पालकमंत्री जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत, त्यांना बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मोहिते पाटील यांनी म्हटले होते.
यानंतर भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.
माळशिरस तालुक्यातील अनेक गावे अजूनही पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप करीत, "पालकमंत्री बदलण्याचा निर्णय तुमच्या हातात नाही," अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
| मुद्दा | तपशील |
| मागणी | सोलापूरचा पालकमंत्री बदला |
| मागणी करणारे | खासदार धैर्यशील मोहिते पाटील |
| मोर्चा | पंढरपूर, दुष्काळावरून |
| पलटवार | राम सातपुते – 'तुमच्या हातात नाही' |
| सवाल | चेतनसिंह केदार – 'बांधावर कधी गेले?' |
| टीका | 'मोर्चा म्हणजे स्टंट' |
| आरोप | 'लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही' |
| राजकीय वातावरण | तापलेलं |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.