क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
मुंबई : राज्यभरात पावसाचा जोर कायम असताना मुंबईमध्ये देखील आज (४ जुलै) सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने जोर कायम ठेवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भाग पूर्णपणे भिजून निघाले आहेत. हवामान विभागाने मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे .
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या असून, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्ट वर आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग, समुद्रकिनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .
गेल्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, शहर आणि उपनगरांतील अनेक भागांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही तासही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे
एच-पश्चिम प्रभाग कार्यालय: १४६.४ मिमी (सर्वाधिक)
सुपारी टाकी महापालिका शाळा, वांद्रे: १४३.४ मिमी
पाली मुंबई महापालिका शाळा, वांद्रे: १४०.६ मिमी
जी-दक्षिण प्रभाग कार्यालय: १४०.२ मिमी
एफ-उत्तर प्रभाग कार्यालय: १३२.० मिमी
मानखुर्द अग्निशमन केंद्र: १२६.८ मिमी
कलेक्टर कॉलनी, चेंबूर: १२४.२ मिमी
महाराष्ट्र नगर, मानखुर्द: १२०.८ मिमी
रमाबाई नगर, घाटकोपर: १२०.२ मिमी
हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
महाराष्ट्रात ४ ते ७ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून, काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे . संभाव्य परिस्थिती पाहता मुंबईतील पालिका आणि आपत्ती व्यवस्थापन सर्व यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे.
रेड अलर्ट असलेले जिल्हे:
मुंबई (आज आणि उद्या)
ठाणे (आज आणि उद्या)
पालघर
रायगड
पुणे घाटमाथा
सातारा
ऑरेंज आणि यलो अलर्ट
ऑरेंज अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यलो अलर्ट: मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा
मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सध्या सुरळीत सुरू आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या नियमितपणे धावत आहेत. मात्र, काही ठिकाणी पाणी साचल्याने गाड्या थोड्या उशिरा धावत आहेत
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या कोणतीही उड्डाण रद्द करण्यात आलेली नाही. मात्र, हवामानाचा अंदाज पाहता प्रवाशांनी विमान कंपन्यांशी संपर्क साधून उड्डाणाची स्थिती जाणून घ्यावी.
शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे. सायन, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी या भागात पाणी साचल्याची माहिती आहे. नागरिकांनी अत्यावश्यक नसल्यास वाहन चालवणे टाळावे.
ठाणे शहरात काल (३ जुलै) सकाळी साडेआठ ते आज (४ जुलै) सकाळी साडेपाच पर्यंत ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज पहाटेपासून अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी ठाण्यामध्ये पडताना पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाकडून आज आणि उद्या ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठाणे शहर आणि जिल्ह्यात आज १५० ते २०० मिमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यावर खालील सूचनांचे पालन करावे:
अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका
सखल भाग, नदी-नाले, समुद्रकिनारे येथे जाणे टाळावे
जीर्ण इमारती, झाडे, होर्डिंग्ज यांच्या जवळ उभे राहू नका
विजेच्या तारा तुटल्यास १९१६ (महापालिका हेल्पलाइन) वर संपर्क साधा
पाणी साचलेल्या भागात वाहन नेऊ नका
आपत्कालीन परिस्थितीत खालील हेल्पलाइन क्रमांक वापरा
बृहन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाइन: 1916
पालघर हेल्पलाइन: 02525 297474, +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका हेल्पलाइन: 022-25364779, 0222530 1740, +91 93723 38827
ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108, 8657887101
पनवेल महानगरपालिका हेल्पलाइन: 02227458040/41/42
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १४६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे घाटमाथा आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसामुळे वाहतूक, विमानसेवा आणि रेल्वे सेवेवर परिणाम झाला असून, हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.