Deputy CM Eknath Shinde: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसभेला संबोधित केले. वाळवा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळवा येथील जाहीर सभेत पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत, असा संदेश देत त्यांनी मतदारांना धनुष्यबाणासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपमुख्यमंत्री सभेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नेते अजित पवार यांना भावपूर्ण अभिवादन करत त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा उल्लेख केला. या कठीण काळात संयम आणि संवेदनशीलतेने वागण्याचे आवाहन करत त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या भूमीला वंदन करत, प्रचार करताना संयम, साधेपणा आणि सकारात्मकता राखण्याचा सल्ला दिला. कोणत्याही टीका-टिप्पणीमुळे समाजातील भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
Post a Comment