⚡ ब्रेकिंग News

धक्कादायक! अमळनेरमधील संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; भाविकांना बाहेर काढण्याचे काम सुरू

'प्रति पंढरपूर'मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग; दिंडी पंढरपूरकडे रवाना; मंदिराची संरचनात्मक तपासणी होईपर्यंत बंद

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला बुधवारी (ता. १) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे संस्थानातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील बैठक खोलीसह इतर अनेक भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ह.भ.प. प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची दिंडी (पालखी) घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेला शॉर्ट सर्किट झाले. या शॉर्ट सर्किटमुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील बैठक खोलीत आग लागली.

मंदिराचे लाकडी बांधकाम आणि दरवर्षी केले जाणारे ऑइल पेंट यामुळे आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. आगीने मंदिराच्या इमारतीचा मोठा भाग गिळंकृत केला. मात्र, सुदैवाने मंदिरातील देवमूर्ती मात्र शाबूत राहिल्या, यामुळे भाविकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर, पारोळा, चोपडा आणि धरणगाव येथील अग्निशमन दलाच्या गाड्या (बंब) तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. खाजगी टँकर आणि स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी मोलाची मदत केली.

या कार्यात एक महत्त्वाची बाब म्हणजे, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पूर्वीच बोरी नदीकाठी रस्ते बांधले होते. यामुळे अग्निशमन बंब घटनास्थळी सहज पोहोचू शकले. अन्यथा सराफ बाजारातील निमुळत्या रस्त्यातून अग्निशमन बंब पोहोचणे शक्य नव्हते.

उपविभागीय अधिकारी (प्रांत) मयूर भंगाळे

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम

उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक लोखंडे

आमदार अनिल पाटील यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चोपडा, शिरपूर आणि पारोळा येथून अतिरिक्त अग्निशमन गाड्या मागवल्या. अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि पारोळा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनीही घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून बचावकार्याची दिशा दिली.

आगीची घटना समोर येताच संस्थानात असलेल्या सेवेकरी आणि भाविकांना तातडीने बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. आगीमुळे मोठी गर्दी झाल्याने आग विझविण्यासाठी अडथळे निर्माण होत होते, तरीही प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवली

अमळनेर शहर पत्रकार संघाने सोशल मीडियावर खाजगी टँकर धारकांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाल्याने अधिक पाण्याची सोय झाली. आमदार अनिल पाटील यांनी आर बी कास्ट्रक्शन चे टँकरही पाठविले.

अथक प्रयत्नांनंतर दोन तासांनी रात्री दहाच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र, मंदिराच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संरचनात्मक तपासणी (Structural Audit) पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानतर्फे घेण्यात आला आहे.

आगीची घटना घडली असली, तरी ह.भ.प. प्रसाद महाराजांची दिंडी थांबली नाही. त्यांनी 'आधी पांडुरंग' असा निर्धार ठेवत आपली दिंडी पंढरपूरकडे रवाना ठेवली. स्वतःच्या आईचे निधन झाले असतानाही प्रसाद महाराजांनी माघारी फिरण्यास नकार दिला. संतांना दुःख-आनंद, मोह-माया काहीच नसते, हे त्यांनी सिद्ध केले. पांडुरंगाच्या भक्तीपुढे त्यांनी सारे दुःख आणि विश्व छोटे मानले.

अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. सुदैवाने मंदिरातील देवमूर्ती शाबूत राहिल्या आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासन, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे वेळेत आग आटोक्यात आली. मात्र, मंदिराच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भाविकांना मोठा धक्का बसला आहे. आता संरचनात्मक तपासणीनंतरच मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले होणार आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...