म्हसवड पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडी का रखडल्या; शेखर गोरेंची पुन्हा निराशा होणार का? उपेक्षित समाजघटकांना संधी मिळणार?
म्हसवड
म्हसवड नगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास सहा महिन्यांचा काळ उलटला आहे, तरीही अद्याप स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी झालेल्या नाहीत. या विलंबामागे अनेक राजकीय कंगोरे आणि अंतर्गत गणिते असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्यातच "भाजप पुन्हा एकदा शेखर गोरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणार का?" असा थेट प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे.
म्हसवड नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी शेखर गोरे यांनी स्वतःचे पॅनल उभे करत आपले सात 'शिलेदार' रिंगणात उतरवले होते. मात्र, प्रचारानंतर भाजप नेत्यांसोबत झालेल्या वाटाघाटींनंतर एक मोठा राजकीय निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शेखर गोरे यांनी आपल्या सर्व शिलेदारांसह भारतीय जनता पार्टीला (भाजप) जाहीर पाठिंबा दिला.
त्यावेळी पडद्यामागे ठरलेल्या तडजोडीनुसार, शेखर गोरे यांच्या या सात शिलेदारांना टप्प्याटप्प्याने स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र, निवडणूक होऊन सहा महिने झाले तरी या निवडी रखडल्याने गोरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
या निवडी नेमक्या का रखडल्या? याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे कोंदण लाभले आहे का? आगामी निवडणुकीत शेखर गोरे यांचा 'बाण' नेमका कोणाला लागणार आणि कोण घायाळ होणार, या राजकीय चाचपणीवरच स्वीकृत नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसते. त्यामुळेच या निवडी लांबणीवर टाकून गोरे यांना थांबवून ठेवले जात आहे का, अशी शंका घेतली जात आहे. भाजप यापूर्वीच्या अनुभवांची पुनरावृत्ती करत शेखर गोरे यांची पुन्हा निराशा करणार की दिलेला शब्द पाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या स्वीकृत नगरसेवक पदांच्या निमित्ताने म्हसवडमधील एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला तोंड फुटले आहे. म्हसवड शहराच्या जडणघडणीत अनेक समाजघटकांचे योगदान मोलाचे आहे, मात्र राजकीयदृष्ट्या ते आजही उपेक्षित आहेत. आजतागायत म्हसवड नगरपालिकेत त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. जसे की भोई समाज, शिंपी समाज, लोहार समाज, कोळी समाज, सुतार समाज, न्हावी समाज
स्वीकृत नगरसेवकांच्या जागांवरून या सर्वसामान्य आणि उपेक्षित वर्गाला संधी देऊन एक नवा आदर्श पायंडा पाडला जाईल का? तसेच, ज्या शिलेदारांनी ऐन निवडणुकीत शेखर भाऊंना मोलाची साथ दिली, त्यांना स्वीकृत करून न्याय मिळवून देऊ शकणार का? की पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशाच पडणार, याचे उत्तर येणारा काळच देई
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.