⚡ ब्रेकिंग News

दिघंचीत घाणीचे साम्राज्य; नळाला येतोय 'आमरस' सारखा पिवळा पाणीपुरवठा!

 

दिघंचीत घाणीचे साम्राज्य; नळाला येतोय 'आमरस' सारखा पिवळा पाणीपुरवठा!

ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक; गुरुवारी दूषित पाण्याने 'जलाभिषेक' आंदोलन करण्याचा इशारा

दिघंची (विशेष प्रतिनिधी)

आटपाडी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे, मोठी बाजारपेठ आणि प्रगत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिघंची शहराला सध्या अस्वच्छता आणि दूषित पाणीपुरवठ्याचा मोठा विळखा बसला आहे. संपूर्ण शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याऐवजी पिवळसर रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. या अत्यंत दूषित पाण्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी, "आम्हाला पाणी नाही, तर नळातून थेट 'आमरस' मिळत आहे," अशी तीव्र खंत आणि संताप व्यक्त केला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून गावातील सामान्य जनता, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांचे नेते या गंभीर समस्येवर सातत्याने आवाज उठवत आहेत. वारंवार तक्रारी करून आणि प्रश्नांचा भडिमार करूनही दिघंची ग्रामपंचायत प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहे. प्रशासनाच्या या ढिम्म आणि 'गेंड्याच्या कातडीच्या' कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

येणाऱ्या गुरुवारी 'जलाभिषेक' आंदोलन; 

ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभाराविरोधात आता दिघंचीतील सर्वपक्षीय नेते, समाजसेवक आणि ग्रामस्थ एकत्र आले आहेत. प्रशासनाला जागे करण्यासाठी शहरात सध्या तीव्र 'धरणे आंदोलन' सुरू करण्यात आले आहे. त्यातच, येत्या गुरुवारी याच दूषित आणि पिवळसर पाण्याने दिघंची ग्रामपंचायत कार्यालयाला 'जलाभिषेक' करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला असून, एका मोठ्या आणि तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

दिघंची हे आटपाडी तालुक्यातील एक प्रमुख आणि आर्थिकदृष्ट्या विकसित केंद्र मानले जाते. मात्र, अशा मोठ्या आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या शहरात रहिवाशांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी तरसावे लागत आहे आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे "शहराचा कथित विकास नक्की गेला कुणीकडे?" असा संतप्त सवाल आता सामान्य दिघंचीकर उपस्थित करत आहेत.

आता गुरुवारी होणाऱ्या या आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येणार की नागरिक जलजन्य आजारांच्या खाईत लोटले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...