आटपाडी: आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील रहिवासी नाथा निवृत्ती पुसावळे यांनी एका व्यक्तीवर गंभीर आरोप करत न्याय मिळण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय पांडुरंग बुधावले या व्यक्तीने रात्रीच्या सुमारास मद्यपान करून पुसावळे यांच्या कारची काच फोडून पेट्रोल ओतून गाडी पेटवून दिली. या घटनेमुळे पुसावळे यांचे सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी पुसावळे यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संशयित आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पोलीस केवळ 'चौकशी करतो' असे सांगून टाळाटाळ करत असल्याचा आरोप पुसावळे यांनी केला आहे.
आरोपीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने पुसावळे आणि त्यांचे कुटुंब दहशतीच्या सावटाखाली जगत आहे. योग्य न्याय न मिळाल्याने आणि पोलिसांच्या असहकार्यामुळे पीडित पुसावळे यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत आरोपीवर कठोर कारवाई होऊन नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.