⚡ ब्रेकिंग News

माणच्या सुपुत्राची हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप! वरकुटे-मलवडीच्या अनिलराज पिसे यांच्या नेतृत्वाखालील 'CBG' प्रकल्पाचे ३० मे रोजी नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

 

माणच्या सुपुत्राची हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप! वरकुटे-मलवडीच्या अनिलराज पिसे यांच्या नेतृत्वाखालील 'CBG' प्रकल्पाचे ३० मे रोजी नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन

खंडाळा (क्रांती न्यूज - प्रतिनिधी):

माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी गावचे सुपुत्र तथा पुणे येथील 'राज प्रोसेस इक्विपमेंट्स अँड सिस्टिम्स प्रा. लि.' कंपनीचे मॅनेजर अनिलराज पिसे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात एक महत्त्वाकांक्षी पाऊल पडत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या १२ TPD क्षमतेच्या 'नेपियर व प्रेसमड मल्टी-फीडस्टॉक CBG' (Compressed Biogas) प्रकल्पाचे भव्य उद्घाटन शुक्रवार, दिनांक ३० मे २०२६ रोजी संपन्न होणार आहे.

'राज क्लीन एनर्जी'च्या वतीने उभारण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प स्वच्छ आणि हरित ऊर्जानिर्मितीच्या दिशेने एक क्रांती मानला जात आहे.

सातारा जिल्ह्यात साकारला भव्य प्रकल्प

हा भव्य उद्घाटन सोहळा 'राज प्रोसेस'च्या मागे, गट नं. ५३०/१, आहिरे (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे पार पडणार आहे. कृषी अवशेष, नेपियर गवत आणि प्रेसमड (उसाचा मळीचा गाळ) यांच्या योग्य प्रक्रियेतून हा 'CBG' प्रकल्प चालवला जाईल. पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि देशांतर्गत पर्यायी इंधन निर्मितीला गती देण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.

अनिलराज पिसे यांच्या कर्तृत्वाचा माण तालुक्याला अभिमान

माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी या ग्रामीण भागातून पुढे येत, उद्योग आणि हरित ऊर्जा क्षेत्रात अनिलराज पिसे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक दृष्टीकोन आणि ग्रामीण विकासाची सांगड घालत त्यांनी 'राज क्लीन एनर्जी'च्या माध्यमातून 'स्वच्छ भारत' आणि 'शाश्वत विकास' या संकल्पनेला मोठे बळ दिले आहे.

त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे माण तालुक्यासह वरकुटे-मलवडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ग्रामीण मातीतून संघर्ष करत पुढे आलेला हा तरुण आज संपूर्ण राज्यासाठी हरित ऊर्जा क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...