⚡ ब्रेकिंग News

​माण-खटावमध्ये शेखरभाऊ गोरे यांच्या आमदारकीची चर्चा; मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ शब्द पाळण्याची वेळ आलीये का?

 


​ताकदीचा नेता, दांडगा जनसंपर्क; भाजप आता तरी शेखरभाऊंना संधी देणार की पुन्हा बंडाचे निशाण फडकणार?

​माण (क्रांती न्यूज - प्रतिनिधी):

माण-खटावच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि भागातील धगधगते नेतृत्व शेखरभाऊ गोरे यांच्या आमदारकीची. गेली अनेक वर्षे राजकारणात आपली स्वतंत्र आणि वेगळी छाप उमटवून असलेल्या शेखरभाऊंनी नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि शासकीय मदतीशिवाय सामान्यांची, कामे मार्गी लावून स्वतःची ओळख 'लोकनेता' म्हणून निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या सुविद्य पत्नी सोनल गोरे यांना कार्यकर्त्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून आणत गोरे यांच्या ताकदीची प्रचिती पुन्हा एकदा दिली.

​देवेंद्र फडणवीसांनी दिलेला 'तो' शब्द पाळणार का?

​वास्तविक पाहता, आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात कित्येक दिवस संघर्ष सुरू असताना, गेल्या निवडणुकीत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाखातर शेखरभाऊंनी माघार घेतली होती. त्यांनी जयकुमार गोरे यांना सशर्त पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळेच म्हसवड नगरपरिषद आणि आमदारकीच्या निवडणुकीत भाजपला एकहाती विजय मिळवता आला, हे राजकीय वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे फडणवीसांनी शेखरभाऊंना आमदारकी संदर्भात दिलेला शब्द आता पाळण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

​कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होणार की पुन्हा बंड?

​माण-खटावमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचा मुख्य चेहरा म्हणून शेखरभाऊ गोरे यांच्याकडे पाहिले


जाते. आपला नेता आमदार व्हावा, ही गेली कित्येक वर्षे कार्यकर्त्यांची असलेली तीव्र इच्छा यंदा पूर्ण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'शेखरभाऊ आणि विजय' हे माण-खटावच्या राजकारणातील पक्के समीकरण मानले जाते. शेखरभाऊ ज्या बाजूने उभे राहतात, त्या बाजूला विजयाचा गुलाल ठरलेला असतो.

​भविष्यातही हे समीकरण टिकवून ठेवायचे असेल, तर भारतीय जनता पार्टीकडून शेखरभाऊ गोरे यांना आमदारकीची संधी दिली जाणार का? की महायुतीमधील जागावाटपामुळे पुन्हा एकदा शेखरभाऊंना बंडाचे निशाण हाती घ्यावे लागणार? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. परंतु, या सर्व घडामोडींमुळे माण-खटावचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...