क्रांती न्यूज - प्रतिनिधी - किरण देशमुख
आटपाडी:
आटपाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निंबवडे येथे अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नासकर तलावाच्या काठावर बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू गाळणाऱ्या चार महिला आरोपींविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ५:२० वाजण्याच्या सुमारास निंबवडे गावच्या हद्दीत नासकर तलावाच्या काठावर काही महिला चोरून दारू भट्टी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, आटपाडी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना पाहताच निलाबाई सुखदेव बुधावले, नगीना अंबादास बुधावले, मीना बाळू बुधावले आणि बाळाबाई अशोक बुधावले (सर्व रा. निंबवडे) हे आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू गाळण्याचे साहित्य आणि कच्चा माल आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण २९,५९८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ८१० लिटर कच्चे रसायन (५४ पत्र्याचे डबे), दारू काढण्याची भांडी, रबरी पाईप आणि इतर साहित्याचा समावेश आहे.
याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय रमेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संबंधित चार महिला आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (डी), (ई) आणि (एफ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण हे करत आहेत.
आटपाडी पोलीस निरीक्षक बहीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.