⚡ ब्रेकिंग News

​अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी २०२९ च्या निवडणुकीत संपूर्ण ताकद उभी करू : आ. शशिकांत शिंदे




​अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी २०२९ च्या निवडणुकीत संपूर्ण ताकद उभी करू : आ. शशिकांत शिंदे

​माण-खटावच्या विकासासाठी आणि युवकांसाठी जगतापांचे कार्य कौतुकास्पद

​क्रांती न्यूज प्रतिनिधी - विशाल माने 

वरकुटे मलवडी :

"अभयसिंह जगताप यांना त्यांच्या पक्षावरील निष्ठेमुळेच पक्षश्रेष्ठींनी माण-खटाव भागाची मोठी जबाबदारी दिली असून, ती ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. युवकांना खेळ, शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम ते करत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष त्यांची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी करेल," अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

​वरकुटे मलवडी (ता. माण) येथे आयोजित 'अभयदादा केसरी' राज्यस्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

​स्वार्थापेक्षा समाजकल्याणाला प्राधान्य देणारे नेतृत्व: शशिकांत शिंदे

​पुढे बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, "अभयसिंह जगताप हे उच्चशिक्षित, समाजाभिमुख आणि तळागाळातील लोकांच्या विकासासाठी सातत्याने झटणारे नेतृत्व आहे. स्वार्थापेक्षा समाजकल्याणाला प्राधान्य देणारे असे नेतृत्व लाभणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अभिमानास्पद आहे. माणसारख्या ग्रामीण भागात सलग चौथ्या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा भरवणे, पैलवानांचा विमा उतरवणे आणि खेळाडूंना मासिक मानधन सुरू करणे ही ऐतिहासिक आणि कौतुकास्पद गोष्ट आहे."

​अभयदादांना मानणारा मोठा वर्ग: संदीप मांडवे

​याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे म्हणाले की, "सामान्य माणसांच्या वेदना जाणून घेऊन त्यांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्याची मोठी खुबी अभयदादांमध्ये आहे. याच संवेदनशील स्वभावामुळे माण-खटाव मतदारसंघातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर त्यांच्याशी जोडला गेला असून तो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे."

​मान्यवरांची उपस्थिती

​या भव्य क्रीडा व राजकीय सोहळ्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, हिंदकेसरी पै. महेंद्र गायकवाड, सांगली जिल्हा परिषद बांधकाम सभापती पृथ्वीराज पाटील, सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक अर्जुनराव खाडे, प्रा. सदाशिव खाडे, खटाव पंचायत समिती सदस्य महेश वाघ, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम माने पाटील, माजी नगराध्यक्ष सागर पोळ, फलटण एज्युकेशन गव्हर्निंग कौन्सिल सदस्य पृथ्वीराज राजेमाने, शकील मुजावर, सुनील खाडे, डॉ. प्रशांत गोडसे, विजय शेटे, इम्रान बागवान यांच्यासह भागातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...