⚡ ब्रेकिंग News

अशोक खरातने ७ महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडलं नाही; हिरव्या रंगाच्या संशयास्पद द्रव्याने गूढ वाढवलं, आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात काय घडणार?

 ओकस प्रॉपर्टीज कार्यालयातून जप्त ‘हिरवे द्रव्य’ फॉरेन्सिक तपासात; खरातला आज न्यायालयात हजर करणार, एसआयटी पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता; १४ गुन्ह्यांमध्ये तपास वेगवान, गरोदर महिलेवरील अत्याचार प्रकरणात चौकशी

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात (उर्फ कॅप्टन) याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्कादायक रहस्य उघड झाले आहे. दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयातून एसआयटीने (विशेष तपास पथक) झडती घेतली. या झडतीत हिरव्या मळकट रंगाचे एक संशयास्पद द्रव्य जप्त करण्यात आले आहे. हे द्रव्य महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी वापरले जात होते का, याचे उत्तर फॉरेन्सिक अहवालातून मिळणार आहे.

एसआयटीने हे नमुने तातडीने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सूत्रांनी सांगितले की, खरातचा ‘पेनड्राइव्ह’ आणि हे ‘हिरवे द्रव्य’ हे दोन पुरावे त्याला जन्मठेपेपर्यंत खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

७ महिन्यांच्या गरोदर महिलेवरही अत्याचार

खरातने ७ महिन्यांच्या गरोदर महिलेलाही सोडले नाही, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. चिंचोंक्याचे खडे बनवून देणारा व्यावसायिक महेश कलंत्री याच्यापासून ते खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची कसून चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशीतून खरातच्या गुन्हेगारी कार्यपद्धतीचे अनेक धक्कादायक तपशील समोर आले आहेत.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील खरातची पोलीस कोठडी आज (सोमवार, १३ एप्रिल) संपत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार असून, एसआयटी आता अन्य गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याची पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे.

आज कोर्टात काय घडणार?

खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषण, खंडणी, सावकारी आणि फसवणुकीचे तब्बल १४ गुन्हे दाखल झाले आहेत. आजच्या सुनावणीत सरकार पक्ष काय भूमिका मांडतो आणि न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, तिसऱ्या गुन्ह्यातील आरोपीला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी एसआयटीकडून अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसआयटीने खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे हिरव्या मळकट रंगाचे संशयास्पद द्रव्य सापडले. हे द्रव्य अत्यंत संशयास्पद असून, महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा त्यांच्यावर मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी वापरले जात असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे.

 कल्पना खरात अद्याप फरार

अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा कल्पना खरातवर दाखल झाल्यानंतर ती नाशिकमधील राहत्या घरातून गायब झाली. दहा दिवस उलटले तरी पोलिसांना तिचा शोध लागलेला नाही. SIT ने आता कल्पनाच्या माहेरी, माहेरच्या नातेवाईकांकडे, नाशिकमधील मैत्रिणींकडे आणि घरात काम करणाऱ्या/केलेल्या नोकरांकडे चौकशी सुरू केली आहे.

 अंजली दमानियांचा दावा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणात पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला. त्यांनी खरातचा सीडीआर तपासून ‘शिजूका’ आणि ‘नॉडी’ या नावाने आलेले असंख्य कॉल्स उघड केले. ट्रूकॉलरवर सर्च केल्यावर ही नावे समोर आली. अंजली दमानिया म्हणाल्या, “खरातने अनेक नंबरना वेगवेगळे कोडवर्ड दिले होते. शिजूका, नॉडी हे त्याचाच भाग असू शकतो. पोलिसांनी या नंबरचा सखोल तपास करावा.”

 सोलापुरात कोट्यावधींची जमीन

अशोक खरातने सोलापुरातही कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात गट क्रमांक २००/१ मधील ४.४८ हेक्टर म्हणजे सुमारे ११ एकरांपेक्षा अधिक जमीन अशोक खरात यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. २८ मार्च २०२४ रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत तब्बल २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये इतकी आहे. या खरेदीखतात कल्पना अशोक खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्या भागातील जमिनीचे साधारण भाव प्रति एकर ५-६ लाख रुपये आहेत. मात्र, अशोक खरात याने २१ ते २२ लाख रुपये प्रति एकर दराने ही जमीन खरेदी केली. यामुळे व्यवहारात अनियमितता असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे.

 तपासाची दिशा

नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) अशोक खरातची रोज चौकशी सुरू आहे. आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातला शिजूका, नॉडी या नावाने आलेले कॉल्स, त्याने दिलेले कोडवर्ड, कल्पना खरातची फरारी, सोलापुरातील जमीन खरेदी — या सर्व बाबी तपासाला नवे वळण देत आहेत.

अंजली दमानिया यांनी सीडीआरमधील माहिती समोर आणून तपास यंत्रणेला नवीन दिशा दिली आहे. त्या म्हणाल्या, “खरातने अनेक नंबरना वेगवेगळे कोडवर्ड दिले होते. शिजूका, नॉडी हे त्याचाच भाग असू शकतो. पोलिसांनी या नंबरचा सखोल तपास करावा.”

 पोलिसांची भूमिका

नाशिक पोलिसांनी अशोक खरात प्रकरणात SIT स्थापन केली आहे. खरात, कल्पना खरात, त्यांच्या सहकाऱ्यांसह इतर संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. सोलापुरातील जमीन खरेदीचा व्यवहार देखील तपासात समाविष्ट करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व पुरावे गोळा करून कठोर कारवाई केली जाईल.

अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया यांनी ‘शिजूका’ आणि ‘नॉडी’ या नावाने आलेल्या असंख्य कॉल्सचा खळबळजनक दावा केला आहे. खरातने अनेक नंबरना कोडवर्ड दिले होते, असा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे, कल्पना खरात अद्याप फरार असून, तिच्या माहेरी, मैत्रिणी आणि नोकरांकडे चौकशी सुरू आहे. सोलापुरात २.४० कोटींची ११ एकर जमीन खरेदी केल्याचेही समोर आले आहे. SIT चा तपास अधिक तीव्र झाला असून, प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...