⚡ ब्रेकिंग News

अंजनगावातील शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला! राजन पाटील यांच्या शिष्टाईनंतर दोन्ही समाजाची सहमती; पुतळा स्थलांतरित होणार, दोन दिवसांत एक कोटी रुपये सुशोभीकरणासाठी


 माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून निर्माण झालेला तणाव अखेर संपला; पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला; पुतळा समोरच्या बाजूला स्थलांतरित होणार, गावात शांतता

अंजनगाव (माढा, सोलापूर) : माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव आणि सामाजिक वाद अखेर संपुष्टात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या शिष्टाईनंतर दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी एकमताने तोडगा काढला. पुतळ्याची जागा खेलोबा देवस्थानची असल्याचे स्पष्ट झाल्याने पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजानेही मान्यता दिली. यामुळे गाव तणावमुक्त झाले असून, आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

आज सकाळपासून गावात शांतता आहे. पोलीस बंदोबस्त कायम असला तरी आंदोलक रात्रीच घरी परतले. मध्यरात्री तीन वाजता मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनीही आपले आंदोलन मागे घेतले.

 राजन पाटील यांची मध्यस्थी फळाला

माजी आमदार राजन पाटील यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी मला मध्यस्थी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींसोबत सातत्याने चर्चा केली. काल रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली.”

पाटील यांनी स्पष्ट केले की, “ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला होता, त्याच समोरच्या बाजूला पुतळा स्थलांतरित करण्यात येईल. चबूतरा बांधल्यानंतर पुतळा हलवला जाईल.” तसेच दोन दिवसांत सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.

 नेमका वाद काय होता?

अंजनगाव येथील खेलोबा मंदिरासमोर रात्रीतून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. प्रशासनाने हा पुतळा तेथून हलवण्याचा निर्णय घेतल्याने दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला. एक गट पुतळा त्याच जागी ठेवण्यावर ठाम होता, तर दुसरा गट ही जागा ग्रामपंचायतीची असल्याचे सांगत विरोध करत होता. वादाने जातीय वळण घेतल्याने परिस्थिती चिघळली. आंदोलकांनी रस्ता रोको केला, दगडफेक झाली आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला.

 तोडग्याची प्रक्रिया

आज दिवसभर दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी केली. पुतळा स्थलांतरित करण्यासाठी नवीन जागा निश्चित करण्यात आली. सरपंच प्रदीप चौगुले यांनी सांगितले की, “सध्या झालेल्या निर्णयावर गावातील सर्व समाज समाधानी आहे.”

पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजन पाटील, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि दोन्ही समाजातील प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जागेची पाहणी करण्यात आली. गावात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश दिला जात नव

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...