नाशिक: स्वतःला ‘दैवी अवतार’ भासवून शेकडो भाविकांना गंडा घालणारा भोंदू अशोक एकनाथ खरात (उर्फ कॅप्टन) आता पूर्णपणे जमिनीवर आला आहे. पोलीस कोठडीचा फास जसजसा घट्ट होत आहे, तसतशी खरातच्या पायाखालची जमीन सरकली असून, कधीकाळी पोलिसांनाच धमकावणारा हा भोंदू आता कोठडीत पुरता हबकला असल्याची माहिती समोर येत आहे.
तपास पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत अशोक खरातचा तोरा काही वेगळाच होता. “तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल,” असे म्हणत तो चक्क तपास करणाऱ्या पोलिसांचेच भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, एसआयटी (विशेष तपास पथक) आणि ईडीच्या (ED) वाढत्या चौकशीमुळे आता त्याची बोलती बंद झाली आहे. आपण आता सहज तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री त्याला पटली असून तो स्वतःच्या भविष्याबद्दल कमालीचा चिंतेत आहे.
अशोक खरातचं जेवण कमी झालं
कोठडीत खरात आता जास्त कोणाशी बोलत नाही. तपासादरम्यान विचारलेल्या प्रश्नांनाही तो त्रोटक उत्तरे देत आहे. चिंतेमुळे त्याचे जेवणही कमी झाले असून तो तासनतास शांत बसून असतो, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, बाहेर पडल्यानंतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने, न्यायालयातील सुनावणी प्रत्यक्ष न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारेच व्हावी, अशी विनंती तो अधिकाऱ्यांकडे वारंवार करत आहे.
बायकोचा पत्ता विचारताच...
अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. ती कुठे आहे? असा प्रश्न जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी विचारला, तेव्हा खरातने “ते देवालाच माहीत” असे म्हणत हात झटकले. मात्र, दुसरीकडे आपला लाडका मुलगा हर्षवर्धन याच्यासाठी तो व्याकुळ झाला आहे. “माझ्या मुलाची मला काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा फोनवर बोलू द्या,” अशी विनंती तो पोलिसांकडे करत आहे.
आज कोर्टात काय घडणार?
भोंदू अशोक खरातला आज (दि. १३ एप्रिल) पुन्हा नाशिक कोर्टात हजर केले जाणार आहे. अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तर चौथ्या गुन्ह्यात पुन्हा आज अशोक खरातला पोलीस कोठडीत मिळण्यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून एसआयटीकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत काय तपास झाला? याचा तपशील तपास यंत्रणा कोर्टात सादर करणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
खरातच्या काळ्या साम्राज्याचे धक्कादायक तपशील
खरातने दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. त्याच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयातून हिरव्या मळकट रंगाचे संशयास्पद द्रव्य जप्त करण्यात आले होते. हे द्रव्य महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी वापरले जात होते का, याचे उत्तर फॉरेन्सिक अहवालातून मिळणार आहे.
एसआयटीने खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे हिरव्या मळकट रंगाचे एक संशयास्पद द्रव्य सापडले आहे. हेच ते गुंगीकारक औषध आहे का, ज्याचा वापर करून खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे? याचे उत्तर आता फॉरेन्सिक अहवालातून मिळणार आहे.
कल्पना खरात अद्याप फरार
अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा कल्पना खरातवर दाखल झाल्यानंतर ती नाशिकमधील राहत्या घरातून गायब झाली. दहा दिवस उलटले तरी पोलिसांना तिचा शोध लागलेला नाही. SIT ने आता कल्पनाच्या माहेरी, माहेरच्या नातेवाईकांकडे, नाशिकमधील मैत्रिणींकडे आणि घरात काम करणाऱ्या/केलेल्या नोकरांकडे चौकशी सुरू केली आहे.
अंजली दमानियांचा दावा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणात पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला. त्यांनी खरातचा सीडीआर तपासून ‘शिजूका’ आणि ‘नॉडी’ या नावाने आलेले असंख्य कॉल्स उघड केले. ट्रूकॉलरवर सर्च केल्यावर ही नावे समोर आली. अंजली दमानिया म्हणाल्या, “खरातने अनेक नंबरना वेगवेगळे कोडवर्ड दिले होते. शिजूका, नॉडी हे त्याचाच भाग असू शकतो. पोलिसांनी या नंबरचा सखोल तपास करावा.”
सोलापुरात कोट्यावधींची जमीन
अशोक खरातने सोलापुरातही कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात गट क्रमांक २००/१ मधील ४.४८ हेक्टर म्हणजे सुमारे ११ एकरांपेक्षा अधिक जमीन अशोक खरात यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. २८ मार्च २०२४ रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत तब्बल २ कोटी ४० लाख ९१ हजार २०० रुपये इतकी आहे. या खरेदीखतात कल्पना अशोक खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्या भागातील जमिनीचे साधारण भाव प्रति एकर ५-६ लाख रुपये आहेत. मात्र, अशोक खरात याने २१ ते २२ लाख रुपये प्रति एकर दराने ही जमीन खरेदी केली. यामुळे व्यवहारात अनियमितता असल्याचे संशय व्यक्त केला जात आहे.
तपासाची दिशा
नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) अशोक खरातची रोज चौकशी सुरू आहे. आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरातला शिजूका, नॉडी या नावाने आलेले कॉल्स, त्याने दिलेले कोडवर्ड, कल्पना खरातची फरारी, सोलापुरातील जमीन खरेदी — या सर्व बाबी तपासाला नवे वळण देत आहेत.
अंजली दमानिया यांनी सीडीआरमधील माहिती समोर आणून तपास यंत्रणेला नवीन दिशा दिली आहे. त्या म्हणाल्या, “खरातने अनेक नंबरना वेगवेगळे कोडवर्ड दिले होते. शिजूका, नॉडी हे त्याचाच भाग असू शकतो. पोलिसांनी या नंबरचा सखोल तपास करावा.”
पोलिसांची भूमिका
नाशिक पोलिसांनी अशोक खरात प्रकरणात SIT स्थापन केली आहे. खरात, कल्पना खरात, त्यांच्या सहकाऱ्यांसह इतर संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. सोलापुरातील जमीन खरेदीचा व्यवहार देखील तपासात समाविष्ट करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व पुरावे गोळा करून कठोर कारवाई केली जाईल.
अशोक खरात प्रकरणात खरात आता कोठडीत पूर्ण हबकला आहे. जेवण कमी झाले, बोलती बंद, तासनतास शांत बसतो. बायकोचा पत्ता विचारताच “देवाला माहिती” असे उत्तर देतो. मुलाशी बोलू द्या अशी विनंती करतो. आज न्यायालयात हजर करणार, एसआयटी चौथ्या गुन्ह्यात पुन्हा कोठडी मागणार. खरातच्या काळ्या साम्राज्यातील धक्कादायक तपशील समोर येत आहेत. तपास अधिक तीव्र झाला असून, प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.