⚡ ब्रेकिंग News

हिंदू २०९० पर्यंत अल्पसंख्याक होतील; नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणावर गोपीचंद पडळकरांचा दावा


  “काँग्रेस-राष्ट्रवादीतील हिंदूंनी गंभीरतेने पाहावे”; नाशिकमध्ये जिहादी कारस्थान चालले असल्याचा आरोप; अहिल्यानगर, खरात प्रकरणाची आठवण; “काश्मीरमध्ये १०० वर्षांपूर्वी हेच घडले”

नाशिक/पुणे: नाशिकमधील मुंबई नाका परिसरातील एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणाला “जिहादी कारस्थान” म्हटले असून, हिंदू समाज २०९० पर्यंत अल्पसंख्याक होईल, असा दावा केला आहे.

नाशिकमधील या प्रकरणात कंपनीतील एचआरसह काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील महिला व तरुणींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेून लैंगिक शोषण, आर्थिक छळ आणि जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. एका पीडित महिलेने धाडसाने तक्रार केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आणि त्यानंतर आणखी नऊ तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांनी एसआयटी स्थापन केली असून, मुख्यमंत्री देखील या प्रकरणात लक्ष घालत आहेत.

 गोपीचंद पडळकरांचा दावा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले, “नाशिकमध्ये जो प्रकार घडला, तो प्रत्येक कंपनीमध्ये घडतो आहे का? नाशिक आयटी हब नाही. पुण्यात जास्त आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी असे प्रकार घडत आहेत का? याचा शोध घेतला पाहिजे.”

ते पुढे म्हणाले, “काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे हिंदू आहेत त्यांनी याकडे गंभीरतेने बघितले पाहिजे. हा काही राजकीय मुद्दा नाही. कंपनीमध्ये जिहादी लोक आहेत का? त्यांची डिग्री खरी आहे का? हे देखील तपासले पाहिजे.”

 २०९० पर्यंत हिंदू अल्पसंख्याक?

सर्वात वादग्रस्त विधान करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “२०९० पर्यंत हिंदू अल्पसंख्याक होतील. काश्मीरमध्ये १०० वर्षांपूर्वी हेच झाले होते. २०२७ च्या जनगणनेनंतर भारतात सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिम समाजाची असेल.”

ते स्पष्ट करत म्हणाले, “मला सरसकट मुस्लिमांच्या बाबतीत बोलायचे नाही. ज्यांना भारत माता की जय, वंदे मातरम म्हणायचे नाही, पाकिस्तान जिंकल्यावर ज्याला फटाके फोडावे वाटतात, त्या बाबतीत आम्ही बोलत आहोत.”

 अहिल्यानगर प्रकरणाची आठवण

पडळकर यांनी अहिल्यानगरमधील एका प्रकरणाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “अहिल्यानगरमध्ये देखील असा प्रकार घडला. लग्न झाले होते, मुलं होती. त्याने दक्ष नाव सांगितले, मात्र तो शेख होता. नाशिकच्या प्रकरणात देखील असेच झाले आहे. मुलीला फोन केला तर समोरून ‘मी दानिशची बायको बोलते’ असे कळले.”

 तुषार भोसले, नवनाथ बन यांची टीका

या प्रकरणावर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणारे मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागला आहे. जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्ट्या झोडता तेव्हा ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करणारा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटतो.”

भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनीही शरद पवारांच्या वारकरी संप्रदायावरील विधानाचा संदर्भ देत म्हटले की, “अर्बन नक्षल देखील वारकरी संप्रदायात घुसखोरी करत आहेत. लव्ह जिहादकडे मात्र शरद पवार मौन बाळगतात.”

 विश्व वारकरी सेनेचा समाचार

विश्व वारकरी सेनेचे हभप गणेश महाराज शेटे यांनी शरद पवारांच्या विधानाचा समाचार घेत म्हटले, “वारकरी संप्रदायाने अंधश्रद्धा निर्मूलन आणि सर्व धर्मांना सामावून घेण्याचे काम केले आहे. पण हिंदू धर्मावर आघात झाल्यास गय केली जाणार नाही. नाशिकचे खरात प्रकरण जगभर गाजले, त्याचा निषेध सर्व वारकऱ्यांनी केला. लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या प्रकरणांवर आम्ही विरोध करतोच.”

पालक आणि समाजाने जागरूक राहावे

गोपीचंद पडळकर यांनी पालकांना आवाहन केले की, “कुटुंबियांनी आपल्या मुलीकडे लक्ष ठेवावे. मुली ट्रिपसाठी कुठे जातात? कोणासोबत जातात? याकडे लक्ष ठेवावे.”

ते पुढे म्हणाले, “एचआरला अटक झाली आहे. तिने दुर्लक्ष केले का? हे बघितले पाहिजे. एका मुलाचे धर्मांतर करण्यात आले हे गंभीर आहे.”

 राजकीय प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायावरील विधान आणि नाशिक प्रकरण यामुळे महाराष्ट्रात धार्मिक-राजकीय ध्रुवीकरण अधिक तीव्र झाले आहे. भाजपने या दोन्ही मुद्द्यांना एकत्र जोडून हिंदू समाजाच्या संरक्षणाची गरज व्यक्त केली आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात स्थापन झालेल्या SIT कडे बीडमधील एका व्यक्तीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा उल्लेख आहे. याबाबत गोपीचंद पडळकर म्हणाले, “रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत काय तक्रार आली हे माहिती नाही. पोलीस तपास घेतील.”

नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या विधानामुळे चर्चा आणखी तीव्र झाली असून, हिंदू समाजाच्या लोकसंख्येच्या मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...