मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करावे आणि त्यांची चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत असताना नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS) यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
"आमच्याकडे सुरुवातीला जी तक्रार आली होती, त्यामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव नव्हते. आरोपीला अटक केल्यानंतर काही माहिती आणि गोष्टी समोर आल्या. शिर्डीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला होता किंवा इतर ठिकाणी काही घटना घडल्या होत्या, हे नंतर समोर आले."
पुढील कारवाई काय?
कर्णिक यांनी सांगितले की, "या प्रकरणातील तपास सुरू आहे. नाशिक व्यतिरिक्त इतर ठिकाणी झालेल्या गुन्हेही विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करण्यात आले आहेत. पुढे मागे यातून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल."
राजकीय दबाव आला का?
अशोक खरातला अटक करताना किंवा चौकशी दरम्यान कुणाचा राजकीय दबाव आला का, असा प्रश्न विचारला असता संदीप कर्णिक म्हणाले,
"खरातला अटक केल्यानंतर कुणाचाही फोन आला नाही, किंवा दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही."
पोलिसांची भूमिका
आयुक्तांनी स्पष्ट केले की, प्रकरणात जे काही पुरावे आणि माहिती समोर येईल त्यानुसार पोलिस योग्य ती कारवाई करतील. सध्या तपास सुरू असून, कोणत्याही राजकीय व्यक्तीला वाचवण्याचा किंवा दबावाखाली येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी सूचित केले.
रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तरीही विरोधकांकडून त्यांची चौकशी आणि सहआरोपी करण्याची मागणी जोर धरली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.