⚡ ब्रेकिंग News

रायगडाच्या पायथ्याशी मनसे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ; राज ठाकरेंचा मनसैनिकांना डेरेदार संदेश


 

 रायगडाच्या पायथ्याशी मनसे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ; राज ठाकरेंचा मनसैनिकांना डेरेदार संदेश

 'हजारो लोकांना पक्षात यायचंय, त्यांना सक्रिय सदस्य करा'; १९ एप्रिल रोजी शिवतीर्थावर गुलाल उधळण्याचं आवाहन

रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...'

रायगड: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) २० वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगी पक्षाच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित मनसैनिकांना संबोधित करताना पक्षविस्तारासाठी महत्त्वपूर्ण आवाहन केले.

राज ठाकरे हे त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे यांच्यासह सहकुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यांनी रोपवेच्या सहाय्याने रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले.

राज ठाकरे काय म्हणाले? 

यावेळी मनसैनिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याचा संदर्भ दिला. ते म्हणाले, "यावर्षी ९ मार्चला वर्धापन दिन आहे आणि १९ एप्रिलला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. त्यामुळे दोन वेळा बोलण्यापेक्षा जे काही बोलायचे आहे ते १९ तारखेलाच एकदाच बोलेन. पण बर्याच दिवसांपासून पक्षाची सदस्य नोंदणी करायची होती, त्यासाठी वर्धापन दिनाचे निमित्त साधलं."

मनसैनिकांना राज ठाकरेंचा डेरेदार संदेश

पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, "आज महाराष्ट्रातल्या सर्व सैनिकांना माझं आवाहन आहे की, अनेक लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. केवळ नोंदणीकृत सदस्य नव्हे, तर त्यांना सक्रिय सदस्य व्हायचे आहे. त्यामुळे ज्या ज्या वर्दळीच्या ठिकाणी स्टॉल्स लागू शकतील, तिथे मनसेचे सदस्य नोंदणी स्टॉल्स लावा. तुम्ही लोकांपर्यंत जा, त्यांच्याशी बोला. हजारो लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. त्यांना तुम्ही सदस्य करून घ्या."

रायगडावरून अभियानाला सुरुवात

याप्रसंगी त्यांनी सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाल्याचे जाहीर केले. "आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावर पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जा. येत्या १९ एप्रिल रोजी शिवतीर्थावर सर्व महाराष्ट्र सैनिकांनी गुलाल उधळत यायचे आहे," असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...