⚡ ब्रेकिंग News

इंधनसंकटात बांगलादेशला मदतीचा हात; भारताकडून ४० हजार टन डिझेलचा अतिरिक्त पुरवठा


  इंधनसंकटात बांगलादेशला मदतीचा हात; भारताकडून ४० हजार टन डिझेलचा अतिरिक्त पुरवठा

 इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईत बांगलादेशच्या मदतीला भारत सज्ज

 बांगलादेश-भारत मैत्री पाईपलाईनद्वारे एप्रिलपर्यंत ४० हजार टन डिझेलचा पुरवठा

 ईदच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या इंधन मागणीमुळे बांगलादेशकडे मदतीचा प्रस्ताव

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगभरात निर्माण झालेल्या इंधनसंकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने शेजारधर्माचे दर्शन घडवले आहे. अडचणीत असलेल्या बांगलादेशने इंधन पुरवठा स्थिर करण्यासाठी भारताकडे मदतीचा हात पसरला असून, भारताने तब्बल ४० हजार टन अतिरिक्त डिझेल पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

युद्धामुळे ठप्प झाला मध्य पूर्वेतील पुरवठा

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांना लक्ष्य केले जात असल्याने मध्य पूर्वेतून होणारा तेल पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. या संकटामुळे अनेक देशांसमोर इंधन टंचाईचं मोठं आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशने भारताकडे मदतीची मागणी केली.

४५ हजार टन डिझेलचा अतिरिक्त पुरवठा

बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसी) च्या माहितीनुसार, भारताने बांगलादेशला ४५ हजार टन अतिरिक्त डिझेल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अलीकडेच ५ हजार टन डिझेल बांगलादेशला मिळाले असून, १८-१९ मार्चदरम्यान आणखी ५ हजार टन डिझेल पोहोचणार आहे. उर्वरित ४० हजार टन डिझेल एप्रिलपर्यंत बांगलादेशला उपलब्ध करून दिले जाईल, असे बीपीसीचे महाव्यवस्थापक मोहम्मद मुर्शेद हुसेन आझाद यांनी स्पष्ट केले.

बांगलादेश-भारत मैत्री पाईपलाईनचा लाभ

ही डिझेल आयात बांगलादेश-भारत मैत्री पाईपलाईनद्वारे केली जाते, जी भारतातील नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला उत्तर बांगलादेशातील पार्वतीपूर इंधन डेपोशी जोडते. मार्च २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या पाइपलाइनचे उद्घाटन केले होते. यापूर्वी मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या काळात पाइपलाइनद्वारे डिझेलची आयात तात्पुरती थांबवण्यात आली होती, परंतु तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने सत्ता स्वीकारल्यानंतर ही निर्यात पुन्हा सुरू झाली आहे.

ईदच्या पार्श्वभूमीवर इंधनाची वाढलेली मागणी

येणाऱ्या ईदच्या सुट्टीत लाखो लोक गावी जाण्यासाठी शहरे सोडतात. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर बांगलादेशने इंधन विक्रीवर तात्पुरती मर्यादा लादली होती. मात्र, भारताकडून मिळणाऱ्या अतिरिक्त डिझेलमुळे सणासुदीच्या काळात देशभरात पुरेसा इंधन साठा उपलब्ध राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...