⚡ ब्रेकिंग News

इराणचा इस्रायलवर 'सेजिल' क्षेपणास्त्र हल्ला; दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला, युएईमध्ये १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक

 इराणचा इस्रायलवर 'सेजिल' क्षेपणास्त्र हल्ला; दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला, युएईमध्ये १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक

 इराणने पहिल्यांदाच वापरले २५०० किमी पल्ल्याचे सेजिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, इस्रायली लष्करी तळांवर नेमबाजी

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा स्फोट, ड्रोन हल्ल्याची शक्यता

 युद्धाच्या १७व्या दिवशी अमेरिका-इस्रायलची दमछाक; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय टँकरना जाण्याची परवानगी

तेहरान: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाला १७ दिवस पूर्ण झाले असून, या संघर्षात इराणने पहिल्यांदाच आजवर न वापरलेले 'सेजिल' बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलवर डागले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इस्रायली लष्करी आणि संरक्षण सुविधांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. हे २००० ते २५०० किलोमीटर पल्ल्याचे घन इंधनयुक्त सामरिक क्षेपणास्त्र असून, यामुळे इस्रायलमध्ये मोठी दहशत पसरली आहे.

दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला

युद्धाची झळ थेट संयुक्त अरब अमिरातीपर्यंत पोहोचली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा स्फोट झाला असून, हा ड्रोन हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली असून, विमानसेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, युद्धादरम्यान सोशल मीडियावर बनावट व्हिडिओ आणि माहिती पसरवल्याप्रकरणी युएईने १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक केल्याची माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे.

युद्धबंदीची चर्चा नाही' - इराण

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, इराणने युद्धबंदी मागितलेली नाही किंवा अमेरिकेशी कोणतीही वाटाघाटी केलेली नाही. अमेरिकेने हे बेकायदेशीर युद्ध असल्याचे मान्य करेपर्यंत इराण प्रत्युत्तर देत राहील, असा इशारा त्यांनी दिला.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद नाही; भारतीय टँकरना परवानगी

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याच्या वृत्तांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. तेथे 'स्मार्ट नियंत्रण' लागू केल्याचे सांगतानाच, हा मार्ग फक्त अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या सहयोगींसाठी बंद असून, काही भारतीय तेल टँकरना जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे इराणने स्पष्ट केले. भविष्यातही ही व्यवस्था सुरू ठेवण्याची इच्छा इराणने व्यक्त केली आहे. अमेरिका मात्र इराणवर जागतिक ऊर्जा पुरवठा रोखल्याचा आरोप करत आहे.

सौदी-यूएई नेत्यांमध्ये चर्चा; जीसीसीची एकजूट

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्यात फोनवर चर्चा झाली. इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले आहे. आपल्या प्रदेशांचे रक्षण करण्यासाठी गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) सर्व प्रयत्न करत राहील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

 

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...