"एक नव्हे दोन विकेटकीपर ठेवा!"; अर्शदीप सिंगची 'वाइड' गोलंदाजी चिमट्यात, अभिषेक शर्माचा व्हिडिओ व्हायरल
संजू सॅमसनसमोर अभिषेक-अर्शदीपची मस्ती; ईशान किशनलाही घेतली राउंड
मुबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 वर्ल्ड कप २०२६ च्या उपांत्य सामन्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक शर्माने अर्शदीप सिंगची वाइड गोलंदाजीवरून चांगलीच टांग खेचली आहे.
भारत-इंग्लंड सामन्यात अर्शदीप सिंगचा दिवस काही खास राहिला नव्हता. त्याने चार षटकांत ५१ धावा दिल्या होत्या आणि तब्बल पाच वाइड चेंडू टाकले होते. सामन्यानंतर टीम बसमध्ये अर्शदीपने अभिषेक शर्माच्या फील्डिंगचे कौतुक करताना "नाइस फील्डिंग" म्हटले. मात्र यावर अभिषेकने लगेच संधी साधत अर्शदीपला चिमटा काढला.
अभिषेक म्हणाला, "अर्शदीपला गोलंदाजी करताना दोन विकेटकीपर लागतात, कारण तो खूप वाइड चेंडू टाकतो." अभिषेकचा हा टोमणा ऐकताच अर्शदीपनेही हसत हसत प्रत्युत्तर दिले. त्याने संजू सॅमसनकडे वळून विचारले, "संजू भाई, मग दोन कीपर लावू का?" आणि लगेच ईशान किशनकडे बोट दाखवत म्हणाला, "आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तर दोन विकेटकीपर आहेतच!"
विशेष म्हणजे या सामन्यात संजू सॅमसन आणि ईशान किशन हे दोन्ही विकेटकीपर खेळत होते, त्यामुळे अर्शदीपचं हे बोलणं अचूक ठरलं. खेळाडूंमधील या मजेशीर संवादाचा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
अभिषेकचा फॉर्म चिंतेचा विषय
दुसरीकडे या वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माचा फॉर्म मात्र भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झळकावलेल्या ५५ धावांचा अपवाद वगळता तो इतर सामन्यांमध्ये फारसा काही खास कामगिरी करू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही त्याने ७ चेंडूत केवळ ९ धावा केल्या. आता अंतिम सामन्यात मोठी खेळी करण्याची अपेक्षा त्याच्याकडून ठेवण्यात येत आहे. अर्शदीप सिंगने मात्र या स्पर्धेत आतापर्यंत ९ विकेट घेत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.