⚡ ब्रेकिंग News

नाशिकमध्ये हादरा: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची राहत्या घरी आत्महत्या

  नाशिकमध्ये हादरा: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची राहत्या घरी आत्महत्या

 गंगापूर रोडवरील घटनेने वैद्यकीय क्षेत्रात शोककळा; पती जिल्हा रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ

नाशिक शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी शुक्रवारी आपल्या राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे नाशिकसह वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ. मनीषा जेजुरकर या आयुर्वेदिक क्षेत्रातील परिचित नाव होत्या. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या कुटुंबात अशी दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील कारणांचा शोध सुरू केला आहे. डॉ. मनीषा यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या घटनेमुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या परिचितांकडून आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. गंगापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...