⚡ ब्रेकिंग News

"महिला पोथ्या-पुराणात अडकल्या, संविधान वाचायचे राहिले"; महिला आयोगाच्या कार्यक्रमात रुपाली चाकणकर यांचे सूचक वक्तव्य

 

"महिला पोथ्या-पुराणात अडकल्या, संविधान वाचायचे राहिले"; महिला आयोगाच्या कार्यक्रमात रुपाली चाकणकर यांचे सूचक वक्तव्य

जागतिक महिला दिनानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम; मुलीच्या हातात संविधान देऊन सासरी पाठवण्याचे आवाहन

महिलांनी पोथ्या-पुराणांपेक्षा संविधान वाचण्यावर अधिक भर द्यायला हवा, असा सूचक सल्ला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

"मिळालेले अधिकार ओळखा"

चाकणकर म्हणाल्या, "आपल्या महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे मात्र राहून गेले. संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार आपण नीट समजून घेतले पाहिजेत. आजही अनेक महिलांना त्यांच्या हक्कांची माहिती नसते."

मुलीच्या हातात संविधान द्या

यावेळी त्यांनी एक महत्त्वपूर्ण आवाहन केले. "जेव्हा मुलीचे लग्न करून तिला सासरी पाठवाल, तेव्हा तिच्या हातात गीता, पोथी किंवा पुराणं न देता तिला भारतीय राज्यघटनेची प्रत द्या. कारण तिचे संरक्षण संविधान करणार आहे, कोणतेही धर्मग्रंथ नव्हे," असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

महिला दिनाचे औचित्य

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग नोंदवला. महिला आयोगाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिलांचे हक्क आणि त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी चाकणकर यांनी महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जागतिक महिला दिनानिमित्त रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या महत्त्वावर बोलताना.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...