⚡ ब्रेकिंग News

इराण-इस्रायल संघर्षाचा फटका; केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी पुरवठा थांबवला, हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगावर संकट

  इराण-इस्रायल संघर्षाचा फटका; केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी पुरवठा थांबवला, हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगावर संकट

 घरगुती गॅसपुरवठा सुरळीत राखण्यासाठी निर्णय; ४-५ दिवसांत उद्योग ठप्प होण्याची भीती

इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातील एलपीजी पुरवठ्यावर उमटू लागले आहेत. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याने देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य उद्योगासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या एलपीजी टँकरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारतातील एलपीजीचा मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने याचा थेट परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. नागरिकांना घरगुती गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

हॉटेल उद्योग ठप्प होण्याची शक्यता

नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वझलवार यांनी सांगितले की, कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे बंद राहिल्यास पुढील चार ते पाच दिवसांत देशातील हॉटेल उद्योग बंद करण्याची वेळ येऊ शकते. हजारो छोटे-मोठे हॉटेल व्यवसाय या गॅसवर अवलंबून असल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

पुण्यातही पुरवठा बंद

पुण्यातील बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांटमध्ये आणि एचपीसीएलच्या चाकण येथील प्लांटमध्ये कमर्शियल सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. डीलर्सना पुढील आदेश मिळेपर्यंत कमर्शियल सिलेंडर घेण्यासाठी गाड्या पाठवू नयेत, अशा सूचना तेल कंपन्यांकडून देण्यात आल्या आहेत.

तेल कंपन्यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, "युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा पुढील सूचनेपर्यंत थांबवण्यात येत आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल." सध्या भारताकडे सुमारे ३० दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

पुनर्विचाराची मागणी

नागपूर रेसिडेंट हॉटेल असोसिएशनने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. युद्धाच्या कठीण परिस्थितीत केंद्र सरकारसोबत असल्याचे सांगतानाच एलपीजीवरील निर्बंध सरसकट न लावता टप्प्याटप्प्याने लागू करावेत, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. तसेच राज्य सरकारने केंद्राशी चर्चा करून हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगासाठी मधला मार्ग काढावा, अशी मागणीही होत आहे. इराण-इस्रायल संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिल्यास भविष्यात घरगुती गॅसपुरवठ्यावरही ताण येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...