"विमान कंपनीचा मालक व्हीके सिंग कुटुंबाला देतोय धमकी" ; पिंकी मालीच्या आईच्या भेटीनंतर आमदार अमोल मिटकरींचा गंभीर आरोप
पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट ; म्हणाले, "सरकारने उपचाराचा खर्च उचलावा, दोषींवर कारवाई व्हावी"
अमोल मिटकरींनी पिंकी मालीच्या आईची घेतली भेट; म्हणाले, "व्हीके सिंग कुटुंबाला धमकावतोय"
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या केबिन क्रू मेंबर पिंकी माली यांच्या आईची भेट घेतली आहे. पिंकीची आई सध्या औरंगाबादमधील सुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मिटकरी रुग्णालयात दाखल झाले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मिटकरी यांनी मोठा आरोप केला. ते म्हणाले, "पिंकी मालीच्या आईला प्रचंड धक्का बसला आहे. पोटचा गोळा गेल्याने त्या माऊलीची प्रकृती बिघडली आहे. मात्र, ही शोकाकुल स्थिती समजून घेण्याऐवजी विमान कंपनीचा मालक व्हीके सिंग या कुटुंबाला धमकावत आहे. तो मस्तीची भाषा करत आहे."
मिटकरी पुढे म्हणाले, "हा अपघात हा केवळ अपघात नसून, डीजीसीए, त्यांचे अधिकारी आणि व्हीएसआर व्हेंचर कंपनीचे अधिकारी या सगळ्यांची यात जबाबदारी आहे. मी महाराष्ट्र सरकारकडे मागणी करणार आहे की, पिंकीच्या आईच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारने उचलावा."
याशिवाय त्यांनी विधानसभेत या प्रकरणी चर्चा न होण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. "अजित पवार यांच्यासारख्या नेत्याबाबत चर्चा होत नसेल तर ते दुर्दैव आहे. विरोधी पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला, पण चर्चा पुढे ढकलण्यात आली. अर्थसंकल्प आणि राज्यसभेची कारणे देत चर्चा टाळली जात आहे. यामुळे संदेह निर्माण होत आहे," असे ते म्हणाले.
उल्लेखनीय म्हणजे, पिंकी मालीचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ती आपल्या पतीसोबत कळवा येथे वास्तव्यास होती. या दुर्घटनेत पिंकीच्या पती सोमकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राप्त माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता.
अपघातात मृत्यूमुखी पडलेले पाच जण:
अजित पवार - उपमुख्यमंत्री
विदीप जाधव - सुरक्षा रक्षक
पिंकी माळी - केबिन क्रू मेंबर
कॅप्टन सुमित कपूर - पायलट
कॅप्टन शांभवी पाठक - पायलट
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.