"एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांना देशाचं सार्वभौमत्व कळत नाही"; खरगेंच्या टीकेवर फडणवीसांचा पलटवार
'टॅरिफ वॉरमध्ये भारत झुकला नाही, अमेरिकेला माघार घ्यावी लागली'; मल्लिकार्जुन खरगेंना देवेंद्र फडणवीसांचा जोरदार प्रत्युत्त
'टॅरिफ वॉरमध्ये भारताने दाखवलं कणखरपणा'; खरगेंच्या 'गुलाम' विधानावर फडणवीसांचा पलटवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. खरगे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'हुकूमशहा' आणि पंतप्रधान मोदींना 'गुलाम' म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भाजप सरकारच्या परराष्ट्र धोरणाचा जोरदार बचाव केला.
फडणवीस म्हणाले, "ज्यांचे संपूर्ण आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेले, त्यांना देश कसा चालवायचा, देश कसा सार्वभौम ठेवायचा याबाबत काहीच माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची उर्जा सुरक्षा जपली आहे, अन्यथा भारताची काय हालत झाली असती हे आपल्याला माहिती आहे."
मुख्यमंत्र्यांनी पुढे अमेरिकेशी झालेल्या व्यापार युद्धाचा संदर्भ देताना सांगितले, "जेव्हा टॅरिफ वॉर झाला तेव्हा भारत झुकला नाही. भारत कणखरपणे उभा राहिला. भारताने त्याचा सामना केला आणि अनेक देशांसोबत टॅरिफ अॅग्रीमेंट केले. त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांनाही मागे हटावं लागलं."
"त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी अशाप्रकारचं भाष्य करणं हास्यास्पद आहे," असा टोला फडणवीसांनी खरगे यांना लगावला.
याशिवाय मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचेही अभिनंदन केले. ते म्हणाले, "पुन्हा एकदा तिरंगा फडवला आहे. न्यूझीलंडचा पराभव करत भारताने अंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली. संजू सॅमसन, अभिषेक यांची फलंदाजी आणि बुमराह, अर्शदीप यांची गोलंदाजी उल्लेखनीय राहिली. सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन." तसेच विधानसभेत संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.