⚡ ब्रेकिंग News

फीस भरण्यासाठी केला त्रास; विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेतला, राष्ट्रवादीच्या नेत्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

फीस भरण्यासाठी केला त्रास; विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेतला, राष्ट्रवादीच्या नेत्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नांदेडमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात आत्महत्या केली. थकबाकीदार फीबाबत वारंवार त्रास दिल्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते जीवन घोगरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नांदेड: शहरातील हडको परिसरातील एका वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतिगृह चालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत.

आकांक्षा मुंजाजी गायकवाड (२५) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नांदेडमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेत होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत विद्यार्थिनी गेल्या ८ ते १० महिन्यांपासून आरोपी जीवन घोगरे यांच्याच मालकीच्या वसतिगृहात राहत होती. वसतिगृहाची थकीत फी भरण्यासाठी घोगरे यांनी तिला सातत्याने त्रास दिला. याच मानसिक छळाला कंटाळून आकांक्षाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सचिव तथा माजी महापालिका विरोधी पक्षनेते जीवन घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अ‍ॅटॉसिटी) गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...