⚡ ब्रेकिंग News

इकडे अमेरिकेचा हल्ल्याचा इशारा, तिकडे इराणचा प्रत्युत्तरात्मक ड्रोन हल्ला; दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर धक


इकडे अमेरिकेचा हल्ल्याचा इशारा, तिकडे इराणचा प्रत्युत्तरात्मक ड्रोन हल्ला; दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ध

मोठा स्फोट, धुराचे लोट, विमानतळ बंद; एमिरेट्सची उड्डाणे रद्द, जेबेल अली बंदरालाही आग

दुबई, दि. ७ – अमेरिकेने इराणविरुद्ध आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर इराणनेही आपला प्रतिकार तीव्र केला आहे. आखाती देशांना लक्ष्य करण्याची इराणची रणनीती कायम असताना आज (७ मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर (रनवे) ड्रोन हल्ला झाला. हा ड्रोन इराणची राजधानी तेहरानमधून डागण्यात आल्याचा संशय आहे.

मोठा स्फोट, विमानतळावर धुराचे लोट

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई विमानतळावर जोरदार स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर हवेत धुराचे मोठे लोट पसरले. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यापूर्वी गेल्या आठवड्यातही इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यात दुबई विमानतळाच्या एका टर्मिनलचे नुकसान झाले होते आणि ४ कर्मचारी जखमी झाले होते.

विमानतळ बंद, एमिरेट्सची उड्डाणे रद्द

प्रवासी, विमानतळ कर्मचारी आणि एअरलाईन क्रू यांच्या सुरक्षेचा विचार करून दुबई सरकारने विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली. 'एमिरेट्स' एअरलाईनने दुबईला येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे पुढील सूचनेपर्यंत रद्द केली आहेत. २८ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान बुकिंग केलेल्या प्रवाशांना तिकीट रद्द करण्याचा (रिफंड) किंवा तारखा बदलण्याचा पर्याय देण्यात आला आहे. 'फ्लाईट रडार'च्या माहितीनुसार, इतर विमानांना ६० ते ९० मिनिटांचा विलंब होत आहे.

अंशतः कामकाज सुरू, प्रवाशांना सूचना

नंतर दुबईच्या मुख्य विमानतळावरून (DXB) आणि अल मक्तूम विमानतळावरून (DWC) काही उड्डाणे अंशतः सुरू करण्यात आली. मात्र, जोपर्यंत एअरलाईन्सकडून प्रवासाची पुष्टी मिळत नाही, तोपर्यंत प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

जेबेल अली बंदरावर आग

दुबई सरकारच्या 'मीडिया ऑफिस'ने सुरुवातीला विमानतळावरील घटनेचे वृत्त फेटाळून लावले होते. मात्र, नंतर त्यांनी माहिती दिली की हवेत नष्ट करण्यात आलेल्या ड्रोनचे/क्षेपणास्त्राचे अवशेष 'जेबेल अली' (Jebel Ali Port) बंदरावर पडल्यामुळे तेथील एका धक्क्यावर (बर्थ) आग लागली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

अमेरिकेच्या हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर इराणने केलेल्या या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ल्यानंतर धुराचे लोट दिसत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...