⚡ ब्रेकिंग News

दिव्यांका त्रिपाठीला ४१ व्या वर्षी मातृत्वाची चाहुल? लग्नाच्या १० वर्षांनी सेलिब्रिटी कपलकडे गुड न्यूज


 दिव्यांका त्रिपाठीला ४१ व्या वर्षी मातृत्वाची चाहुल? लग्नाच्या १० वर्षांनी सेलिब्रिटी कपलकडे गुड न्यूज

 'ये है मोहब्बतें'च्या सेटवर फुललेल्या प्रेमाला आता नवीन कळी; कुटुंबीय आणि मित्रमंडळीत आनंदाचे वातावरण

मुंबई: टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय जोडपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या आयुष्यात लवकरच एक नवा अध्याय सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. लग्नाला १० वर्षे पूर्ण झालेले हे सेलिब्रिटी कपल लवकरच आई-वडील होणार असल्याची माहिती मिळत आहे.

गुड न्यूजची चर्चा का रंगली?

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, दिव्यांका आणि विवेक यांच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून, घरात नवीन पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. लवकरच 'बेबी शॉवर' (डोहाळे जेवण) समारंभ होणार असून, यावेळी टीव्ही इंडस्ट्रीतील जवळचे मित्र आणी कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अधिकृत घोषणेची प्रतिक्षा

दिव्यांका आणि विवेक हे दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य कायम खासगी ठेवतात. या वृत्तावर दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, चाहत्यांमध्ये या बातमीमुळे उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांना शुभेच्छा देत असून, लवकरच अधिकृत घोषणा करण्याची मागणी करत आहेत.

अशी सुरू झाली प्रेमकथा

दिव्यांका आणि विवेक यांची पहिली भेट 'ये है मोहब्बतें' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ८ जुलै २०१६ रोजी या जोडप्याने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या दहा वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा येण्याची चर्चा असल्याने चाहते आणि कलाविश्वातील मित्रमंडळी आनंदात आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...