⚡ ब्रेकिंग News

पुण्यात दहावीच्या परीक्षेदरम्यान खळबळजनक प्रकार! परीक्षा केंद्रात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला


  पुण्यात दहावीच्या परीक्षेदरम्यान खळबळजनक प्रकार! परीक्षा केंद्रात घुसून विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

 ओतूर येथील एसएससी परीक्षा केंद्रात अल्पवयीन मुलाची धाडसी एन्ट्री; जुन्या वादातून हल्ला, जखमी विद्यार्थ्याने रक्ताच्या थारोळ्यात दिली परीक्षा

पुणे: पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील एसएससी परीक्षा केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (१६ मार्च) सकाळी दहावीची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रात घुसून एका अल्पवयीन मुलाने विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली.

परीक्षा केंद्रातच रक्तपात

ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील एसएससी परीक्षा केंद्रात ही घटना घडली. अकरावीत शिकणाऱ्या एका मुलासह चार जण परीक्षा केंद्रात घुसले आणि दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला चढवला. आरोपीने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र विद्यार्थ्याने हाताने झेलल्याने मोठी दुर्घटना टळली. यात विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

जखमी अवस्थेत दिली परीक्षा

जखमी विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा परीक्षा केंद्रात पाठवण्यात आले. हाताला रक्त येत असताना आणि गंभीर दुखापत झाली असतानाही या विद्यार्थ्याने आपली परीक्षा दिली. या घटनेनंतर परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडाली होती.

जुन्या वादातून हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला. जखमी विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्चलाही आरोपींनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही माहिती आपल्यापर्यंत नसल्याचे सांगितले. सीसीटीव्हीमध्येही असा काही प्रकार दिसून आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोपींना ताब्यात

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मुख्य आरोपीसह इतर चार जणांना ताब्यात घेतले असून, हल्ल्यात वापरलेला कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

शाळा प्रशासनाची भूमिका

या प्रकरणी मुख्याध्यापक म्हणाले, "ही घटना सकाळी १०.३५ च्या सुमारास घडली. यावेळी वर्गात कोणताही शिक्षक नव्हता. हे मोठे परीक्षा केंद्र असून, यापुढे गेटवरच हॉलतिकीट तपासूनच विद्यार्थ्यांना आत सोडण्यात येईल. परीक्षा केंद्राची सुरक्षा आणखी वाढवण्यात येईल." दरम्यान, या घटनेमुळे परीक्षा केंद्रावरील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...