परीक्षा सुरू असताना सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; उद्याचा भूगोलाचा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका येणार? प्रशासनात खळबळ
सांगोला: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान सांगोला शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उद्या (१८ मार्च) होणाऱ्या भूगोल विषयाच्या पेपरआधीच चोरट्यांनी परीक्षा केंद्राची 'स्ट्राँग रूम' फोडून तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरून नेल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्रावर भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका अत्यंत सुरक्षित स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, बुधवारचा पेपर होण्यापूर्वीच अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिकांचा संच चोरून नेला.
सकाळी उघडकीस आला प्रकार
परीक्षा केंद्रावर सकाळी कर्मचारी दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्ट्राँग रूमचे कुलूप तुटलेले आणि प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा गायब असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या खोलीतून ही चोरी झाल्याने परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे
पोलीस आणि शिक्षण मंडळाकडून तपास
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आता हा पेपर रद्द करायचा की नवीन प्रश्नपत्रिका पुरवायची, याबाबत शिक्षण मंडळाच्या निर्णयाकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लागले आहे.
पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
परीक्षा सुरू असताना अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परीक्षेच्या गोपनीयतेवरचा विश्वास डळमळीत झाला असून, शिक्षण विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर टीका सुरू झाली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.