⚡ ब्रेकिंग News

"जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील"; रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेल आणि चंद्राबाबू नायडूंवर निशाणा

"जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील"; रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेल आणि चंद्राबाबू नायडूंवर निशाणा

रोहित पवारांचा दिल्लीत घेतला मोर्चा; प्रफुल्ल पटेल-नायडूंचे नाव घेत म्हणाले, "वैयक्तिक संबंधांमुळेच अजित पवारांना न्याय मिळत नाही"

रोहित पवारांचा पुन्हा दिल्ली दौरा; प्रफुल्ल पटेल-नायडूंवर गंभीर आरोप, जय पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष वेधले

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा दिल्ली गाठून अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी मोठी भूमिका मांडली आहे. त्यांनी यावेळी प्रफुल्ल पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच जय पवार यांच्याकडे महत्त्वाची माहिती असून ते लवकरच ती सार्वजनिक करतील, असेही त्यांनी सांगितले.

रोहित पवार म्हणाले, "आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू स्वतः रोहित सिंगच्या लग्नाला उपस्थित होते. त्यांच्यासोबत राममोहन होते. त्यांच्याशी वैयक्तिक संबंध असल्यामुळेच अजित पवारांना न्याय मिळू शकत नाही." त्यांनी पुढे प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधताना म्हटले, "प्रफुल्ल पटेल यांना रोहित सिंग यांच्या संबंधांबद्दल माहिती आहे. आम्ही त्यांच्या पत्रकार परिषदेसाठी थांबलो आहोत. माझं प्रफुल्ल पटेलांसोबत खूप चांगलं होतं असं नाही. कदाचित काकूंनाही माहिती नसेल की प्रफुल्ल पटेल रोहित सिंगच्या लग्नाला होते."

जय पवारांकडे महत्त्वाची माहिती

रोहित पवार यांनी जय पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, "जय पवार यांच्याकडे माहिती आहे, ती ते पुढे आणतील." दरम्यान, जय पवार यांची आज होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली असून ते पुण्याला गेल्याचे सांगितले जात आहे.

शिवराज सिंग चौहान यांच्याकडे इशारा

रोहित पवार यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडेही नाव न घेता इशारा केला. ते म्हणाले, "रोहित सिंगच्या लग्नाला मध्य प्रदेशचे मोठे नेते होते, आता ते दिल्लीत आले आहेत. चार पाच दिवस जाऊ द्या."

सपा, डीएमके, झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना भेटणार

रोहित पवार यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्याची माहिती दिली. ते म्हणाले, "अखिलेश यादव यांनी आम्हाला बराच वेळ दिला. त्यांनी सांगितले की समाजवादी पक्षाच्या खासदारांना आम्ही भेटून या प्रकरणाची माहिती द्यावी. आज संध्याकाळी आम्ही सपा खासदार, कानिमोली, सोरेन यांना भेटणार आहोत. या सगळ्यांना भेटल्याशिवाय आम्ही दिल्लीतून जाणार नाही."

अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विधिमंडळात अजित पवार अपघातावर चर्चा न होण्याबद्दल संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "विधिमंडळात अजित पवारांच्या अपघातावर चर्चा का केली जात नाही? कशाच्या दहशतवादाखाली सगळे आमदार आहेत?" जय पवार यांच्याबद्दल बोलताना मिटकरी म्हणाले, "जय पवार यांची पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे. त्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे ते मांडतील. कोणी माय-लाल आहे जो जय पवारांवर दबाव आणेल? जर कोणी असं प्रेशर आणेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे."

पिंकी मालीचे कुटुंबीयही न्यायाच्या मागणीसाठी सज्ज

अजित पवारांसमवेत विमान दुर्घटनेत दगावलेल्या पिंकी माळीचे कुटुंबीयही आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी पुढे येत आहेत. यापूर्वी घाटकोपरला विमान अपघात झाला तेव्हा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी एफआयआर दाखल केला होता, मात्र आता पोलीस एफआयआर का करत नाहीत, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...