युद्धतणाव असतानाही सोने-चांदीच्या दरात घसरण; गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी
सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक; दोन दिवसात चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण, सोनेही झाले स्वस्त
युद्धतणावाच्या दरम्यान सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचे ढग गडद झाले असताना जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम उमटू लागले आहेत. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आली असताना, सोने आणि चांदीच्या दरात मात्र आश्चर्यकारक घसरण पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असतानाच, सोन्या-चांदीच्या दरातही मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल १५०० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी शिवाय १,६१,००० वरून १,५९,५०० रुपयांवर स्थिरावले आहेत. तर चांदीच्या दरात दोन दिवसांत दोन हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. चांदीचे दर जीएसटी शिवाय २,६८,००० वरून २,६६,००० रुपयांवर आले आहेत.
युद्ध असताना सोने का स्वस्त होत आहे?
युद्धजन्य परिस्थितीत सोने हे सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जाते. मात्र सध्या गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा कच्च्या तेलाकडे वळवल्याने सोने-चांदीच्या दरात काही प्रमाणात घसरण होत असल्याचे सोने व्यावसायिकांचे म्हणणे आहे. क्रूड ऑइलच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होत आहेत.
तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर (प्रति १० ग्रॅम)
दिल्ली
- २४ कॅरेट - ₹ १,६३,७९०
- २२ कॅरेट - ₹ १,५०,१४०
- १८ कॅरेट - ₹ १,२२,८७०
मुंबई
- २४ कॅरेट - ₹ १,६३,६३०
- २२ कॅरेट - ₹ १,४९,९९०
- १८ कॅरेट - ₹ १,२२,७२०
चेन्नई
- २४ कॅरेट - ₹ १,६३,०९०
- २२ कॅरेट - ₹ १,४९,५००
- १८ कॅरेट - ₹ १,३०,०००
कोलकाता
- २४ कॅरेट - ₹ १,६३,६३०
- २२ कॅरेट - ₹ १,४९,९९०
- १८ कॅरेट - ₹ १,२२,७२०
हैदराबाद
- २४ कॅरेट - ₹ १,६१,६८०
- २२ कॅरेट - ₹ १,४८,२००
- १८ कॅरेट - ₹ १,२१,२६०
विशेष म्हणजे अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र एकाच आठवड्यात पुन्हा एकदा दरात घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शनिवार-रविवार बाजारपेठ बंद असताना आज नव्या दराने बाजार सुरू झाला असून पुढील काळात सोन्याचे दर कोणत्या दिशेने जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.