⚡ ब्रेकिंग News

ट्रम्प एकाकी! होर्मुजवर युद्धनौका पाठवायला नाटो देशांचा साफ नकार; "मला कुणाची गरज नाही" म्हणत संतापले ट्रम्प


  ट्रम्प एकाकी! होर्मुजवर युद्धनौका पाठवायला नाटो देशांचा साफ नकार; "मला कुणाची गरज नाही" म्हणत संतापले ट्रम्प

 अमेरिकेच्या आवाहनाला जर्मनी, स्पेन, इटलीचा 'नो'; ब्रिटनची उशिरा केलेली ऑफरही फेटाळली, ट्रम्प म्हणाले - "आम्ही जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र"

वॉशिंग्टन: इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा राजनैतिक धक्का बसला आहे. होर्मुजची सामुद्रधुनी (स्ट्रेट ऑफ होर्मुज) सुरक्षित करण्यासाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन ट्रम्प यांनी सात देशांना केले होते; मात्र कोणत्याही देशाने ही विनंती मान्य न केल्याने ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे.

"आम्हाला कोणाचीही गरज नाही"

ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. "आम्हाला कोणाचीही गरज नाही. आम्ही जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहोत. आमचे लष्कर सर्वात शक्तिशाली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आलो आहे की, जर कधी आम्हाला त्यांची गरज भासली, तर ते मदतीला धावून येणार नाहीत," असे ट्रम्प म्हणाले.

नाटोवरही निशाणा

ट्रम्प यांनी नाटो संघटनेवरही ताशेरे झोडपले. जर मित्रराष्ट्रांनी मदत केली नाही, तर या संघटनेचे भविष्य अंधकारमय असेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका आणि युरोपीय मित्रराष्ट्रांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

कोणत्या देशाने काय भूमिका घेतली?

ट्रम्प यांच्या आवाहनाला प्रमुख युरोपीय देशांनी स्पष्ट नकार दिला. जर्मनी, स्पेन आणि इटलीने तर तात्काळ नकार दिला. ब्रिटनने सुरुवातीला नकार दिला; मात्र संघर्ष संपल्यानंतर युद्धनौका देण्याची तयारी दर्शवली. मात्र ट्रम्प यांनी ही ऑफर फेटाळून लावत "युद्ध संपल्यानंतर मला युद्धनौकांची काहीच गरज नाही," असे प्रत्युत्तर दिले.

इटली: अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले.

जपान: होर्मुजच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदल पाठवणार नाही.

ऑस्ट्रेलिया: होर्मुजमध्ये आपली जहाजे उतरवणार नाही.

तुर्किए: अमेरिकेचा हल्ला हा धोका आहे, युद्धापासून दूर राहू इच्छितो.

ब्रिटन: चर्चेतून तोडगा निघावा याचे समर्थन.

जर्मनी: हे युद्ध आमचे नाही.

स्पेन: युद्ध नव्हे, शांततेला प्राधान्य द्या.

फ्रान्स: अमेरिकेचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारा.

इराणची 100 जहाजे बुडवल्याचा दावा

दरम्यान, ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या कारवाईत मोठे यश मिळवल्याचा दावा केला आहे. "इराणचे हवाई दल आणि नौदल संपले आहे. इराणची 100 जहाजे आणि युद्धनौका बुडवल्या आहेत. अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम आणि रडार नष्ट केले आहेत. इराणचे नेते मारले गेले आहेत. 47 वर्षांपासून दहशत पसरवणाऱ्यांविरोधात आता कारवाई केली जात आहे," असे ट्रम्प म्हणाले. मात्र, या दाव्याचे स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकलेली नाही.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...