संघर्ष आणि सशक्तीकरणाची गोष्ट; योगिता भोसले मुख्य भूमिकेत, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचाही सहभाग
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका दमदार कथानकाची भर पडणार आहे. महिला सशक्तीकरणाचा प्रभावी विषय घेऊन येणाऱ्या 'अभया' या चित्रपटाचा फर्स्ट लूक अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात आला आहे. ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेड आणि आरडीजी प्रॉडक्शनच्या सहकार्याने हा चित्रपट तयार होत असून, १३ मार्च २०२६ रोजी पोस्टर लाँच करण्यात आले.
स्टारकास्टची चर्चा
'अभया' चित्रपटात अभिनेत्री योगिता भोसले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याने चित्रपटाची चर्चा रंगली आहे. कमलेश सावंत, गणेश यादव, रोहित कोकाटे आणि हर्षा निक्कम यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन युसुफ सुरती यांनी केले आहे.
काय आहे कथा?
'अभया' हा चित्रपट एका महिलेच्या प्रवासाभोवती फिरतो, जी आयुष्यातील अनेक संकटांना धैर्य आणि निर्धाराने सामोरी जाते. संघर्ष, शक्ती आणि सशक्तीकरण या विषयांना अधोरेखित करणारी ही कथा प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडणारी ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. कंपनीचे अध्यक्ष डॉ. विमल राज माथुर म्हणाले, "'अभया' ही अत्यंत भावनिक आणि प्रभावी कथा आहे. आयुष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाणाऱ्या एका स्त्रीची ताकद या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे."
प्रदर्शनाची तारीख?
पोस्टर प्रदर्शनासोबतच चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली असून, लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. दमदार विषय, ताकदवान कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या भूमिकेमुळे 'अभया' चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.